
अबब! 3 लाखांहून अधिक किंमत... नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल थक्क
सॅमसंग W27 च्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 18,999 युआन म्हणजेच सुमारे 2,72,000 रुपये आहे. तर 1TB स्टोरेजवाल्या टॉप-ऑफ-द-लाइन ऑप्शनची किंमत 21,999 युआन म्हणजेच सुमारे 3,15,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन 13 नोव्हेंबरपासून सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सॅमसंग W27 जिहू ब्लू आणि जिक्सिया होंग या दोन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Samsung)
सॅमसंग W27 हा एक डुअल-सिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 17 वर बेस्ड लेटेस्ट वन यूआय 9 सह येतो. हँडसेटमध्ये 8-इंच QXGA+ (2,504 x 2,256 पिक्सेल) 2X डायनॅमिक अमोलेड फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 16 मिलियन कलर्स ऑफर करतो. डिव्हाईसच्या बाहेरील बाजूला 6.5-इंच फुल-एचडी+ (1,080 x 2,520 पिक्सेल) 2X डायनॅमिक अमोलेड स्क्रीन मिळणार आहे, ज्यामध्ये इनर स्क्रीन सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत.
नवा स्मार्टफोन क्वालकॉमच्या कस्टम ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 3.6GHz वर क्लॉक करण्यात आलेले सहा एफिशिएंसी कोर आणि दोन परफॉर्मेंस कोर मिळणार आहेत, जे 4.74GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देतात. स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील मिळणार आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या इंग्रेस प्रोटेक्शन (IP) रेटिंगची पुष्टी केली नाही.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेल (f/1.7) चा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सल (f/1.9) चा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूम आणि 30x डिजिटल जूम सपोर्ट वाला 10-मेगापिक्सेल (f/2.4) चा टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये दोन 10-मेगापिक्सेलचे कॅमेरे मिळणार आहेत, ज्यामधील एक इनर डिस्प्ले आणि दूसरा आउटर डिस्प्लेवर देण्यात आला आहे.
Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या
सॅमसंग W27 मध्ये 45W वायर्ड आणि 20W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Ans: Samsung W27 स्मार्टफोन चीनमध्ये 'Heart of the World' या इव्हेंटदरम्यान लाँच करण्यात आला आहे.
Ans: Samsung W27 च्या 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,999 युआन (सुमारे 2.72 लाख रुपये) आहे. तर 1TB व्हेरिअंटची किंमत 21,999 युआन (सुमारे 3.15 लाख रुपये) आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 for Galaxy हा प्रोसेसर देण्यात आला आहे.