परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल
ओप्पोचा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB+1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 73,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 82,000 रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप-ऑफ-द-लाइन 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 96,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 24 एप्रिल रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून ग्राहक ओप्पोच्या ऑनलाईन स्टोअरवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रो एनर्जेटिक ऑरेंज, फ्री व्हाइट, नेटिव्ह टायटॅनियम आणि रायडिंग द विंड (चिनी भाषेतून भाषांतरित) या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Oppo)
ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रो एक डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो ओप्पोच्या लेटेस्ट अँड्रॉईड 16-बेस्ड कलरओएस 16 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फुल एचडी+ (1,216 x 2,640 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 300Hz चा टच सँपलिंग रेट, 1.07 बिलियन कलर्स, 460 पीपीआयचे पिक्सेल डेंसिटी, 95.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट ऑफर करतो.
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 चिपसेट दिले आहे, जे 4.21GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या फोनमध्ये आर्म माली एमसी 12 जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हँडसेट धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग ऑफर करतो.
ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रोमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून्ड क्वाड रियर कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा 200-मेगापिक्सेल (f/1.6) चा आहे, ज्यामध्ये ऑटोफोकस आणि टू-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) फीचर आहे,. या हँडसेटमध्ये 200-मेगापिक्सेल (f/2.6) चा टेलीफोटो पेरिस्कोप कॅमेरा देखील आहे, ज्यामध्ये टू-एक्सिस OIS आणि 120x पर्यंत डिजिटल जूम दिले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे, जो 120-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू ऑफर करतो. सेकेंड जनरेशन डान्क्सिया कलर रिप्रोडक्शन सेंसर देखील यामध्ये समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.4) चा सेल्फी कॅमेपा दिला आहे. हा फोन 8K/30 fps पर्यंतच्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.
ओप्पोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,025mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 7, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, बेईडू, क्यूजेडएसएस, ग्लोनॅस, गॅलीलियो आणि NavIC सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आले आहे.






