Amazon Great Indian Festival 2025: आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करा Redmi Note 14 Pro Plus, 10 हजार रुपयांनी झाला स्वस्त
Redmi Note 14 Pro Plus Price Dropped: नवीन आणि प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Indian Festival सेल 2025 तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आला आहे. या सेलमध्ये तुम्हाला प्रिमियम आणि तुमचे ड्रिम स्मार्टफोन बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर विविध ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ऑफर्स आणि डिस्काऊंटसह महागड्या स्मार्टफोनची किंमत देखील बरीच कमी होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Indian Festival सेल 2025 तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे.
हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश
Amazon Great Indian Festival सेल 2025 मध्ये Redmi Note 14 Pro Plus ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच हा मिड-रेंज स्मार्टफोन आता बजेट किंमतीत उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. Redmi Note 14 Pro Plus मध्ये ट्रिपल कॅमेरा, स्ट्रॉन्ग ड्यूरेबिलिटी, प्रीमियम डिझाईन आणि AI फीचर्स देण्यात आले आहेत. Amazon सेलमध्ये Redmi Note 14 Pro Plus वर दिलं जाणाऱ्या डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Redmi )
Redmi Note 14 Pro Plus हा स्मार्टफोन कंपनीने 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता Amazon Great Indian Festival सेल 2025 मध्ये या स्मार्टफोनची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे Amazon Great Indian Festival सेल 2025 मध्ये Redmi Note 14 Pro Plus हा स्मार्टफोन केवळ 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये बँक ऑफर्सचा देखील समावेश आहे. तुम्हाला देखील या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एसबीआय किंवा अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक कार्ड असणं आवश्यक आहे.
Redmi Note 14 Pro Plus स्मार्टफोन सेलमध्ये त्याच्या लाँच किंमतीपेक्षा 10 हजार रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ग्राहक EMI ऑप्शनचा देखील लाभ घेऊ शकणार आहेत. याशिवाय तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता आणि त्याच्या स्थिती आणि मॉडेलनुसार सर्वोत्तम किंमत मिळवू शकता. यामुळे फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
मिड रेंज किंमतीत उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन बराच टिकाऊ आहे. या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंग देण्यात आली आहे. Redmi Note 14 Pro Plus मध्ये 6.67-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि iPhone 17 सारख्या 3,000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन मिळाले आहे.
फोन Snapdragon 7s Gen 3 चिपसेटने सुसज्ज आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 6,200mAh आहे, जी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मेन, 8MP अल्ट्रावाइड आणि 50MP टेलीफोटो लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.