Quick India Movement Sale 2025: Swiggy आणि Instamart वर सुरु झाला मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
Instamart चा क्विक इंडिया मूव्हमेंट सेल 2025 हा 19 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. स्विगी आणि इंस्टामार्ट या अॅप्सवर हा सेल सध्या लाईव्ह आहे. हा सेल 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून ग्राहकांना सेलदरम्यान खरेदीवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे. या सेलचा कालावधी 10 दिवसांचा असणार आहे. कंपनीच्या या सेलदरम्यान 50,000 हून अधिक प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे.
ग्राहक अॅपल, वनप्लस, जेबीएल आणि मार्शल सारख्या टॉप ब्रँड्सचे गॅझेट, होम इलेक्ट्रॉनिक्स आणि फेस्टिव एसेंशियल्स कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट या वस्तूंची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत केली जाणार आहे. एवढंच नाही तर क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर iPhone Air आणि iPhone 17 सारखे लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्स देखील उपलब्ध असणार आहेत. मात्र या स्मार्टफोनवर कोणतंही डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. हे डिव्हाईस ग्राहकांना त्यांच्या लाँच किंमतीत खरेदी करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने एक प्रेस रिलीज जारी केलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, 19 सप्टेंबरपासून सुरु झालेला इंस्टामार्ट क्विक इंडिया मूवमेंट सेल 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. टॉप ऑफर्समध्ये ग्राहकांना 50 ते 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय केवळ 10 मिनिटांत डिलीव्हरची सुविधा देखील मिळणार आहे. ग्राहकांनी त्यांच्या आवडत्या डीलसाठी मतदान केले आहे, या डिल्स गोल्डन आवर (सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत) दरम्यान उपलब्ध असणार आहेत, ज्यामध्ये OnePlus 13R, Hammer AirFlow इअरबड्स आणि इतर प्रोडक्ट्स समाविष्ट आहेत.
OnePlus 13R चे 12GB + 256GB व्हेरिअंट 44,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र इंस्टामार्ट क्विक इंडिया मूवमेंट सेल 2025 मध्ये हे डिव्हाईस 38,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Hammer AirFlow Wireless Airbuds ची किंमत सेलमध्ये केवळ 349 रुपये ठेवण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रति तासाला प्राइस ड्रॉप्स देखील असणार आहेत. यावेळी वस्तूंची किंमत अत्यंत कमी असणार आहे.
बेस्ट फेस्टिव डिस्काउंट्सबद्दल बोलायचं झालं तर 18,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला OnePlus Nord CE4 Lite आता सेलमध्ये 16,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Oppo K13x 5G हा स्मार्टफोन 12,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे, याची लाँच किंमत 16,999 रुपये आहे. याशिवाय ग्राहकांना गॅजेट्स आणि होम अप्लायंसेजच्या खरेदीवर देखील मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. Lenovo IdeaPad Slim 3 (i5, 16GB RAM, 512GB SSD) ची किंमत आता 48,999 रुपये झाली आहे. तर हे डिव्हाईस 70,790 रुपयांना लाँच करण्यात आले होते. तर JBL Flip 5 Bluetooth Speaker आता 4,999 रुपयांत उपलब्ध आहे. अॅक्सिस, आयसीआयसीआय, आरबीएल, एचएसबीसी, आयडीएफसी आणि एयू बँक कार्ड वापरून खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत त्वरित सूट मिळेल.