आला रे आला! Redmi चा स्वस्तात मस्त 5G Smartphone आला, 50MP कॅमेरासह कमाल फीचर्सनी सुसज्ज
तुम्ही देखील नवीन स्मार्टफोनच्या शोधात आहात का? एक असा स्मार्टफोन शोधत आहात का ज्याची किंमत 15 हजारांहून कमी असेल? किंवा असा एखादा स्मार्टफोन जो तुमच्या बजेटमध्ये असेल? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोनच्या दुनियेत धमाका करण्यासाठी Redmi सज्ज झाला आहे. टेक कंपनी Redmi ने आज 28 जुलै, 2025 रोजी एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 14 SE 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने नवीन डिव्हाईस बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. Redmi Note 14 लाइनअपमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर Redmi च्या या ऑल न्यू डिव्हाईसमध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये रिफ्रेश रेट 120 Hz आणि पीक ब्राइटनेस 2,100 निट्स आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये 5,110 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – X)
Redmi Note 14 SE 5G is not holding back with segment leading killer specs:
✅Smoothest 120Hz AMOLED + Brightest 2100nits
✅Toughest Corning® Gorilla® Glass 5
✅ Loudest Dual-stereo SpeakersKiller Note at killer price of ₹13,999*.
Sale on 7th August: https://t.co/ns8eFiNVSJ pic.twitter.com/8Oh7tKFhxE— Redmi India (@RedmiIndia) July 28, 2025
Redmi Note 14 SE 5G मध्ये पावरफुल मीडियाटेक 7025 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टवाले डुअल स्टीरियो स्पीकर देखील आहेत. तसेच, जर तुम्हाला अजूनही वायर्ड इयरफोन वापरायचे असतील तर तुम्हाला त्यात 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळत आहे. त्यामुळे तुम्ही या स्मार्टफोनसोबत वायर्ड इयरफोन आणि वायरलेस ईअरबड्स देखील वापरू शकता.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसच्या कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, डिव्हाइसमध्ये तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा Sony Lyt 600 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच, डिव्हाइसमध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये 20-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील आहे. त्यामुळे हा फोन फोटोग्राफीसाठी स्वस्तात मस्त पर्याय आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ज्यामुळे बजेट स्मार्टफोन शोधात असणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम डिव्हाईस आहे. Redmi Note 14 SE 5G ची किंमत 14,999 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रिमसन आर्ट कलर व्हेरिएंट मिळेल. यामध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. डिव्हाइसची पहिली विक्री 7 ऑगस्टपासून Mi, Flipkart आणि Xiaomi रिटेल स्टोअरमध्ये सुरू होईल.