भारतीय रेल्वेने उचललं मोठं पाऊल! तब्बल 2.5 करोड IRCTC अकाउंट्स केले डिलीट, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
इंडियन रेलवे कॅटरिंग अँड टूरिज्म कारपोरेशन म्हणजेच IRCTC भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. तिकीट बुक करणं, रेल्वेचे अपडेट्स इत्यादीसाठी IRCTC अॅप प्रवाशांसाठी फायद्याचे ठरते. 2002 च्या सुरुवातीला हे अॅप भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी लाँच केले होते. तिकीट बुकिंग करण्यासाठी, रेल्वेचे अपडेट्स मिळवण्यासाठी, जेवण ऑर्डर करण्यासाठी, टूरिज्म सर्विसेजसाठी हे अॅप प्रवाशांसाठी अतिशय फायद्याचे आहे.
भारतीय रेल्वेने एजेंट्सची सुरु असलेली मनमानी थांबवण्यासाठी आणि अॅपवरील फेक अकाऊंट्सबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. अॅपवरील फेक अकाऊंट्सवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. तिकीट बुकिंगमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत आणि व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. 2.5 करोड फेक IRCTC यूजर अकाउंट्स आता बंद करण्यात आले आहेत. डिजिटल सफाई अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, ज्या अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे, ते सर्व अकाऊंट्स बनावट ओळखीद्वारे बनवण्यात आले होते, या अकाऊंट्सचा उपयोग एजेंट्स आणि दलाल तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी करत होते. रेल्वेच्या डेटा एनालिसिस टीमने सांगितलं आहे की, या अकाउंट्सची ओळख पटवण्यात आली असून त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. सामान्य प्रवाशांना योग्य संधी देणे आणि ब्लॅक मार्केटिंग आणि मध्यस्थांना आळा घालणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.
IRCTC अकाऊंट आधार लिंकिंग करणं अनिवार्य झाले आहे. आता फक्त आधार-व्हेरिफाईड युजर्सच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. यामुळे बनावट ओळखपत्रांसह तिकीट बुकिंग थांबेल आणि फक्त खऱ्या प्रवाशांनाच प्राधान्य मिळेल. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, आता एकूण रेल्वे तिकिटांपैकी 89 टक्के तिकिटे आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपद्वारे ऑनलाइन बुक केले जात आहेत.
IRCTC वरून तिकीट बुक करणं अधिक सोपं झालं आहे. याशिवाय बदलत्या नियमांमुळे सामान्य युजर्सना अधिक प्राधान्य दिलं जात आहे. अनेकदा IRCTC युजर्सना लॉगिन करण्यात अडचण येते किंवा अनेकदा असंही घडतं की युजर्स पासवर्ड विसरतात. तुम्हाला देखील IRCTC वर लॉगिन करण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही देखील तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर काही सोप्या पद्धतीने पासवर्ड रिसेट करू शकता.