OMG! स्मार्टफोन असाव तर असाच... Redmi च्या नव्या मॉडेलने सर्वांचेच वेधले लक्ष, बजेट किंमतीत ऑफर करते Premium Features
Redmi ने त्यांचा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Redmi Turbo 4 Pro या नावाने लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm च्या ऑक्टा-कोर Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि 16GB पर्यंत रॅमसह जोडलेला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा युनिट आणि 20-मेगापिक्सल सेल्फी स्नॅपर आहे. फोनमध्ये ‘सॉफ्ट मिस्ट ग्लास’ बॅक कवर आहे. यामध्ये 7,550mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो.
Redmi Turbo 4 Pro स्मार्टफोन 12GB + 256GB, 16GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi Turbo 4 Pro स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 25,700 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 26,900 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
हँडसेटच्या 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 29,300 रुपये, 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 31,600 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,100 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोन Harry Potter Edition मध्ये देखील लाँच करण्यात आला आहे. Redmi Turbo 4 Pro Harry Potter Edition च्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 32,800 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे सर्व व्हेरिअंट Xiaomi China ई-स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Redmi Turbo 4 Pro launched in China. | 12+256GB Price 💰 ¥2199
📱6.83″ 1.5K flat OLED LTPS display, 120Hz RR, 3840Hz PWM, 1800 nits HBM
🦾Snapdragon 8s Gen 4
– LPDDR5x RAM & UFS 4.0
🍭 Android 15
📸 50MP Sony LYT600 OIS+8MP
🤳20MP selfie
🔋7550mAh battery#RedmiTurbo4pro pic.twitter.com/KjnWXxuryk— Sûjåñ Tharu (@SujanTharu66) April 24, 2025
Redmi Turbo 4 Pro मध्ये 6.83-इंच 1.5K (1,280×2,800 पिक्सेल) OLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट, 3,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 3,840Hz PWM डिमिंग आणि Dolby Vision ला सपोर्ट करते. हे 4nm ऑक्टा-कोर Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरवर चालतो, ज्याला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB तक UFS 4.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडलेले आहे. फोन Android 15-बेस्ड HyperOS 2 सह लाँच करण्यात आला आहे.
फोटोग्राफीलाठी, Redmi Turbo 4 Pro मध्ये 50-मेगापिक्सल 1/1.95-इंच Sony LYT-600 प्रायमरी सेंसर आहे, ज्यामध्ये OIS, EIS आणि f/1.5 अपर्चर आहे. यामध्ये f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे. फ्रंटला f/2.2 अपर्चरसह 20-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील आहे.
हँडसेंटमध्ये 7,550mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कंपनीने दावा केला आहे की, ते 22.5W रिव्हर्स फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देते.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, Galileo, GLONASS, NavIC, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.
Redmi Turbo 4 मध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP66+IP68+IP69 रेटिंग्स आहे. यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि यामध्ये एक इन्फ्रारेड ट्रांसमीटर आहे, ज्याचा वापर होम अप्लांयसेजला कंट्रोल करण्यासाठी केला जाऊ शकतो.