Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या
एसी ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा दोन्ही ऋतूंमध्ये फायदेशीर ठरते. एसीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे घर असो किंवा ऑफिस सध्या अनेक ठिकाणी एसीचा वापर केला जात आहे. त्यामुळे ऑफर्स दिसतात लोक एसी खरेदी करतात. पण एसी नक्की कधी खरेदी करावा. एसी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती हे अनेकांना अद्याप माहितीच नाही.
Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स
बहुतेक लोकांना असं वाटतं जर सर्दी म्हणजेच हिवाळ्यामध्ये जर त्यांनी एसी खरेदी केला तर त्यांना उन्हाळ्याच्या तुलनेत कमी किंमत मिळेल आणि पैशांची बचत देखील होईल. अनेकजण असा विचार करतात की हिवाळ्यात एसीची मागणी कमी होते त्यामुळे कंपन्या आणि दुकानदार एसीच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट देतात. त्यामुळे डिवाइसची किंमत कमी होते आणि हे डिवाइस कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. मात्र हे खरं आहे का? खरंतर सत्यता यापेक्षा पूर्णपणे उलट आहे. एसी खरेदी करताना योग्य वेळ कोणती आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतात. अनेकांना वाटतं की हिवाळ्यात एसीची किमती कमी होतात. त्यामुळे आपल्याला स्वस्तात एसी खरेदी करण्याची संधी मिळते माध्यम असं नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्हालाही आतापर्यंत असं वाटत होतं की मागणी कमी झाल्यामुळे हिवाळ्यात एसीच्या किमती कमी होतात. तर कदाचित तुम्हीही चुकताय. कंपन्यांचा हिशोब हा मागणीवर नाही. तर प्रोडक्शनवर असतो. हिवाळ्यात एसीची मागणी कमी झाल्यामुळे प्रोडक्शन देखील कमी होते. सहज हिवाळ्यात कंपन्या हीटर गिझर सारख्या प्रॉडक्ट्सवर त्यांच्या लक्ष केंद्रित करतात याच करणामुळे हिवाळ्यात एसीच्या खरेदीवर जास्तीचे डिस्काउंट केले जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात एसी खरेदी करण्याचा तुमचा निर्णय चुकीचा ठरू शकतो.
हिवाळ्यात एसीची मागणी अत्यंत कमी असते. जसे ऑफिस, बिजनेस प्लेसेस आणि गिफ्टिंग पर्पजसाठी एसीची खरेदी केली जाते. आणि यामुळे दुकानदारांवर स्टॉक क्लिअर करण्याचा कोणताही दबाव नसतो आणि हेच कारण आहे ज्यामुळे हिवाळ्यात एसीच्या खरेदीवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
पण जर तुम्ही उन्हाळ्यात एसीची खरेदी केली तर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंटसह बचत करण्याची संधी मिळू शकते. कारण या काळात एसीची मागणी प्रचंड असते आणि कंपन्या त्यांनी नवीन लाँच केलेले प्रोडक्ट्स देखील मार्केटमध्ये घेऊन येत असतात. या प्रोडक्ट्सवर देखील मोठ्या ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जातात. ज्यामुळे जुना स्टॉक सहज क्लियर केलं जाऊ शकतो आणि लोकांना नवीन वस्तू खरेदी करण्याची देखील संधी मिळू शकते.
जर तुम्ही देखील एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च ते एप्रिल हा काळ अत्यंत योग्य ठरतो. या महिन्यात नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च केले जातात. तसेच मागणी जास्त असल्यामुळे दुकानदार आणि कंपन्या देखील प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स देतात. ज्यामुळे बचत देखील होतील आणि नवीन एसी खरेदी करण्याची संधी देखील मिळते.