One UI 7: Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! 'या' स्मार्टफोन्सना मिळणार नवं अपडेट, लिस्ट आली समोर
स्मार्टफोन आणि टेक कंपनी Samsung ने या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या Android 15-बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम (OS) One UI 7 च्या रोलआउटची अधिकृत घोषणा केली होती. अपडेटबाबत घोषणा करताना कंपनीने हे अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी रिलीज केलं जाईल त्याची यादी देखील जाहीर केली होती. आता कंपनीने या यादीमध्ये आणखी काही स्मार्टफोनच्या नावांचा समावेश केला आहे. कंपनीने आता हे अपडेट मिळण्यास पात्र असलेल्या डिव्हाईसची यादी वाढवली आहे.
UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी
कंपनीने अपडेटची घोषणा केली तेव्हा सांगण्यात आलं होतं की, हे अपडेट फक्त Samsung Galaxy S23 सिरीज आणि नवीन मॉडेल्सपुरते मर्यादित असणार आहे, परंतु आता दक्षिण कोरियाच्या या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने या यादीमध्ये इतर स्मार्टफोन सीरिजचा देखील समावेश केला आहे. नवीन यादीप्रमाणे आता आगामी अपडेट Galaxy S22, Galaxy S21 सीरिज आणि इतर अनेक फोन सपोर्टेड डिव्हाइसेससाठी रिलीज केले जाणार आहे, ज्यामुळे अधिक युजर्सना Android 15 चा अनुभव घेता येईल. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगने त्यांच्या न्यूजरूम पोस्टमध्ये घोषणा केली की, सिंगापूरमधील गॅलेक्सी S7 युजर्ससाठी One UI 24 ची रोलआउट 14 एप्रिलपासून सुरू होईल. यासोबतच, ब्रँडने Android 15-बेस्ड अपडेटसाठी पात्र असलेल्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटची यादी देखील शेअर केली. कंपनीने शेअर केलेल्या यादीमध्ये खालील डिव्हाईसचा समावेश आहे.
The official rollout of #OneUI7 will start on April 7, bringing a bold new design for greater personalization and control to the user experience. Read how the update will empower users to interact with their Galaxy devices more naturally than ever before: https://t.co/Q4NFpFXwi2 pic.twitter.com/yJvuLe188e
— Samsung US Newsroom (@SamsungNewsUS) March 20, 2025
यापूर्वी, फक्त Galaxy S23 Series, Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5, Galaxy Tab S9 Series आणि नवीन मॉडेल्सना One UI 7 अपडेट मिळण्याची पुष्टी करण्यात आली होती. परंतु सिंगापूरमध्ये अपडेटच्या रोलआउटची घोषणा झाल्यानंतर पात्रता यादी वाढवण्यात आली आहे, ज्याची सुरुवात Galaxy S24 Series पासून झाली आहे. ब्रँडने अद्याप इतर गॅलेक्सी उपकरणांसाठी अपडेट रोलआउट तारीख निश्चित केलेली नाही. तसेच, भारतातील Samsung Galaxy S24 Series, Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 युजर्सना 7 एप्रिलपासून अपडेट मिळण्यास सुरुवात होईल.
जानेवारीमध्ये Galaxy S25 सीरीजमधे प्रथम One UI 7 अपडेट सादर करण्यात आलं. हे अपडेट अधिक कस्टमायझेशन पर्यायांसह विजुअल एन्हांसमेंट्स, नाऊ बार नावाची एक नवीन नोटिफिकेशन सिस्टम आणि पुन्हा डिझाइन केलेले वन UI विजेट्स यांचा समावेश होता. याशिवाय, Galaxy AI सूटद्वारे समर्थित नवीन वैशिष्ट्ये देखील त्यात समाविष्ट आहेत.