Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लाँच; 6.7 इंच डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung व्हिएतनाममध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A06 लाँच केला आहे. हा बजेट फोन असल्याचं सांगितलं जात आहे. Galaxy A05 स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून Samsung Galaxy A06 लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy A06 हा फोन Android 14 वर बूस्ट करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2024 | 08:52 AM
Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लाँच (फोटो सौजन्य - X )

Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लाँच (फोटो सौजन्य - X )

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय टेक कंपनी Samsung ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A06 जागतिक बाजारात लाँच केला आहे. येत्या काही दिवसांतच या फोनची पहिली विक्री सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच Samsung चा हा फोन देखील अत्यंत उत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज असेल यात काही शंकाच नाही.

हेदेखील वाचा- Samsung सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधा आणि मिळवा 8.40 कोटी रुपये कमावण्याची संधी

कंपनीने व्हिएतनाममध्ये आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A06 लाँच केला आहे. हा फोन गुपचुप लाँच करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या हा फोन इतर मार्केटमध्ये लाँच करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. Galaxy A05 स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून Samsung Galaxy A06 लाँच करण्यात आला आहे. Galaxy A05 प्रमाणेच Samsung Galaxy A06 देखील बजेट किंमतीत उपलब्ध असेल अशी ग्राहकांना आशा आहे. Samsung Galaxy A06 स्मार्टफोन 6.7 इंच डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. फोनचे फीचर्स पाहता ग्राहकांची फोनच्या बाबतीत असणारी उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

सॅमसंगने व्हिएतनाममध्ये आपला नवीनतम बजेट फोन Samsung Galaxy A06 लाँच केला आहे. येत्या आठवडाभरात जागतिक बाजारपेठेतही हा फोन लाँच केला जाईल. फोनमध्ये SSD कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचा पर्यायही आहे. नवीनतम Samsung Galaxy A06 स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले आणि डिझाइनच्या स्वरूपात बदल दिसून आले आहेत.

Samsung Galaxy A06 चे डिटेल्स

Samsung Galaxy A06 हा फोन Galaxy A05 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे. यात मागील मॉडेल प्रमाणेच 6.7-इंच डिस्प्ले आहे, परंतु रिफ्रेश दर 90Hz पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच A05 च्या 60Hz पॅनेलच्या तुलनेत देखील बदल आहे. डिझाईननुसार, फोनमध्ये “की आयलँड” सौंदर्याचा समावेश आहे जो मागील गॅलेक्सी ए-सिरीज फोनवर दिसत होता. की आयलँड हा फोनच्या उजव्या फ्रेमवर आहे, जिथे तुम्हाला व्हॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर दोन्ही मिळतील.

हेदेखील वाचा- Samsung ने परत मागवले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह; 250 आगीच्या घटना, 40 लोक जखमी

स्टोरेज आणि रॅम

Samsung Galaxy A06 हा फोन MediaTek Helio G85 चिपद्वारे समर्थित आहे. हा फोन 4GB किंवा 6GB रॅमसह 64GB किंवा 128GB स्टोरेज पर्याय देते. फोन Android 14 वर बूस्ट करतो. सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

कॅमेरा

Samsung Galaxy A06 मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि एक सेकेंडरी सेन्सर आहे.

बॅटरी

Samsung Galaxy A06 मध्ये 5000mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत आणि विक्री तपशील

फोनच्या किंमतीचाही अंदाज लावला जाऊ शकतो. असे मानले जाते की फोनची किंमत सुमारे EUR 200 म्हणजेच सुमारे18,200 रुपये किंवा त्याहून कमी असेल. Samsung Galaxy A05 भारतात 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करण्यात आला होता. त्यामुळे हा फोन सुध्दा बजेट सेगमेंटमध्येच सादर केला जाईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Samsung galaxy a06 smartphone launch with 6 7 inch display and 5000mah battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 08:52 AM

Topics:  

  • Samsung Galaxy

संबंधित बातम्या

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनला छप्परफाड मागणी! कंपनीचा साठाच संपला
1

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनला छप्परफाड मागणी! कंपनीचा साठाच संपला

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात
2

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात

सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध; किंमत ₹1,09,999 पासून
3

सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध; किंमत ₹1,09,999 पासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.