सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात
सॅमसंगने आज भारतातील ग्राहकांसाठी त्यांचे सातव्या पिढीमधील फोल्डेबल स्मार्टफोन्स – गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई, तसेच गॅलॅक्सी वॉच८ सिरीजच्या विक्रीच्या शुभारंभाची घोषणा केली. आजपासून भारतात गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई आणि गॅलॅक्सी वॉच८ सिरीजची विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या जवळच्या रिटेल आऊटलेट्समध्ये जाऊन या डिव्हाईसची खरेदी करू शकतात. याशिवाय ग्राहक Samsung.com, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील डिवाईसेस खरेदी करू शकतात.
आला रे आला! Redmi चा स्वस्तात मस्त 5G Smartphone आला, 50MP कॅमेरासह कमाल फीचर्सनी सुसज्ज
गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि,गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई या स्मार्टफोन्सना मोठे यश मिळाले आहे, या स्मार्टफोन्सनी विक्रमी प्री-ऑर्डर्सची नोंद केली आहे. यामुळे ब्रँडच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या सातव्या पिढीसाठी ग्राहकांची मोठी मागणी व उत्साह पाहायला मिळाला. गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई या स्मार्टफोन्सनी पहिल्या ४८ तासांमध्ये २१०,००० प्री-ऑडर्सची नोंद केली आणि नवा विक्रम नोंदवला. या स्मार्टफोन्सनी या वर्षाच्या सुरूवातीला गॅलॅक्सी एस२५ सिरीजने संपादित केलेल्या प्री-ऑर्डर्सचा टप्पा गाठला.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि झेड फ्लिप७ सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात सडपातळ, वजनाने हलके आणि सर्वात प्रगत झेड सिरीज डिवाईसेस आहेत, असा दावा केला जात आहे. अत्याधुनिक कार्यक्षमता आणि गॅलॅक्सी एआयसह हे स्मार्टफोन्स सर्वोत्तम, अनुकूल सोबती आहेत, जे रिअल टाइममध्ये वापरकर्त्यांच्या गरजांना ओळखतात आणि प्रतिसाद देतात. मोठा व स्थिर डिस्प्ले, प्रो-ग्रेड कॅमेरे आणि संदर्भाशी संबंधित इंटेलिजन्सच्या माध्यमातून गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि झेड फ्लिप७ उत्पादकता, सर्जनशीलता व कनेक्शनसह अद्वितीय अनुभव देतात.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये गॅलॅक्सी प्रगतीशील वैशिष्ट्ये आहेत. या आतापर्यंतच्या सर्वात सडपातळ, वजनाने हलका आणि सर्वात प्रगत झेड सिरीज स्मार्टफोनमधून अल्ट्रा-लेव्हल अनुभव मिळतो. या स्मार्टफोन्सच्या व्यापक स्क्रिनवर सर्वोत्तम, उच्च-स्तरीय कार्यक्षमता मिळते, ज्यामुळे युजर्स गेमिंग, स्ट्रिमिंगचा आनंद घेण्यासोबत कन्टेन्ट निर्मिती करू शकतात. कॅमेरा आणि जेमिनी लाइव्हच्या माध्यमातून स्क्रिन शेअरिंगसह युजर्स जेमिनीला स्क्रिनवर पाहणाऱ्या गोष्टींबाबत सहजपणे विचारू शकतात. युजर्स जेमिनीला जवळच्या रेस्टॉरँटबाबत विचारू शकतात.
तसेच, गॅलॅक्सी झेड फोल्ड७ चा अल्ट्रा-ग्रेड २०० मेगापिक्सल हाय-रिझॉल्यूशन कॅमेरा कुठूनही सुस्पष्टपणे फोटो व व्हिडिओ कॅप्चर करतो, ज्यामुळे युजर्सना व्यावसायिक दर्जाचे कन्टेन्ट तयार करतात येतात. उदाहरणार्थ, जनरेटिव्ह एडिट सारखी सोईस्कर एडिटिंग वैशिष्ट्ये आता फोटोमधील मागील बाजूस असलेल्या व्यक्तींना ओळखू शकते आणि कोणाला फोटोमधून काढून टाकावे याची सक्रियपणे शिफारस करू शकते. ज्यामुळे मॅन्युअली निवडण्याची व एडिट करण्याची गरज भासत नाही. या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये अनुकूलता, टिकाऊपणा आणि लक्षवेधक नवीन डिझाइन आहे.
गॅलॅक्सी झेड फ्लिप७ मध्ये सर्वोत्तम कार्यक्षमता आणि कॉम्पॅक्ट व आयकॉनिक फॉर्ममध्ये एकीकृत वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत. एज-टू-एज फ्लेक्सविंडोसह युजर्स स्वत:ला अभिव्यक्त करू शकतात, त्यांच्यासाठी क्षणात प्रमुख वैशिष्ट्ये उपलब्ध होऊ शकतात आणि ते कनेक्टेड राहू शकतात, ज्यासाठी डिवाईस ओपन करण्याची गरज भासत नाही. गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आकर्षक सेल्फीजपासून सिनेमॅटिक व्हिडिओ कॅप्चर करण्याच्या आणि कन्टेन्ट शेअर करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करतो, जेथे ही गतीशीलता व सर्जनशीलता फक्त फ्लिप डिवाईसेसमध्ये उपलब्ध आहे. नाऊ बार गॅलॅक्सी झेड फ्लिप७ च्या फ्लेक्सविंडोवर उपयुक्त माहिती देते, ज्यामुळे युजर्स त्यांच्या दिवसभरातील टास्क्सवर नियंत्रण ठेवू शकतात, जसे गाणी, करत असलेल्या कामाची प्रगती आणि राइडशेअर ईटीए. जेमिनी लाइव्ह युजर्सना जेमिनीसह ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणाऱ्या गोष्टी व चॅट रिअल टाइममध्ये फ्लेक्सविंडोवरून शेअर करण्याची सुविधा देते.
युजर्स फ्लेक्स मोडमध्ये कॅमेरा देखील शेअर करू शकतात आणि जेमिनीसोबत हँड्स-फ्री संवाद साधू शकतात. गॅलॅक्सी झेड फ्लिप७ चा फ्लेक्सकॅम सहजपणे परिपूर्ण सेल्फी कॅप्चर करतो. फ्लेक्सविंडोवरील रिअल-टाइम फिल्टर्स त्वरित युजर्सच्या फ्लेक्सकॅम सेल्फीजमध्ये बदल करू शकतात, ज्यामुळे ते अधिक एडिटिंग न करता फोटो पोस्ट किंवा शेअर करू शकतात. पाळीव प्राण्यांसाठी पोर्ट्रेट स्टुडिओ सारख्या धमाल नवीन वैशिष्ट्यांसह युजर्स कोणताही कॅप्चर किंवा डाऊनलोड केलेला पाळीव प्राण्याचा फोटो कलाकृतीमध्ये बदलू शकतात. ते कलात्मक चित्रांसारख्या शैली, २डी कार्टून, फिशआय लेन्स फोटो किंवा व्यावसायिक दर्जाच्या पोर्ट्रेट्समधून निवड करू शकतात.
72 हजार फोटो आणि बरंच काही… Tea App चा Data Leak, पुरूषांना रेट करणाऱ्या अॅपवर आलं मोठं संकट!
गॅलॅक्सी वॉच८ सिराीजमध्ये गॅलॅक्सी वॉच८ आणि गॅलॅक्सी वॉच८ क्लासिक यांचा समावेश आहे. गॅलॅक्सी वॉच८ मध्ये प्रगत सेन्सर तंत्रज्ञान आहे आणि सर्वोत्तम एआय-समर्थित अनुभव देते, ज्यामुळे युजर्सना आरोग्यावर देखरेख ठेवण्यासोबत अधिक कनेक्टेड जीवनाचा आनंद घेता येतो. गॅलॅक्सी वॉच८ मध्ये अत्यंत सडपातळ कूशन डिझाइन, दिवसभर आरामदायीपणासाठी डायनॅमिक लग सिस्टम फ्लेक्स आणि अधिक अचूक सेन्सर कॉन्टॅक्ट आहे. सतत आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी सॅमसंगच्या बायोअॅक्टिव्ह सेन्सरचा फायदा घेत हे वॉचेस् झोप, तणाव, पोषण व अॅक्टिव्हिटीबाबत रिअल-टाइम माहिती व त्वरित रिवॉर्डस् किंवा अलर्टस् देतात. तसेच आरोग्याबाबत त्वरित, प्रेरणादायी अभिप्राय देखील देतात. याव्यतिरिक्त स्मार्टवॉचमध्ये पहिल्यांदाच गॅलॅक्सी वॉच८ मध्ये अॅण्टीऑक्सिडण्ट इंडेक्स सादर करण्यात आले आहे.