Samsung सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधा आणि मिळवा 8.40 कोटी रुपये कमावण्याची संधी (फोटो सौजन्य - pinterest)
कोणत्याही व्यक्तिचा स्मार्टफोन हॅक करणं हल्ली अत्यंत सोपं झालं आहे. हॅकर्स विविध पध्दतींचा वापर करून युजर्सचे स्मार्टफोन हॅक करतात. मात्र असे असले तरी देखील कंपन्या त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेसाठी अनेक नवनवीन फीचर्स लाँच करत आहेत. ज्यामुळे स्मार्टफोन युजर्सना पूर्णपणे सुरक्षा प्रदान केली जाईल आणि युजर्सचा डेटा लिक होणार नाही. दक्षिण कोरियाची आघाडीची टेक कंपनी Samsung देखील त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेसाठी अनेक नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. कंपनीचे युजर्स पूर्णपणे सुरक्षित राहावेत याची Samsung नेहमीच काळजी घेत असते. यासाठी आता कंपनीने एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. कंपनीच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधणाऱ्या व्यक्तिला Samsung ने 8.40 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
हेदेखील वाचा- Realme ने लाँच केलं जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान, फक्त 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज होईल स्मार्टफोन!
दक्षिण कोरियाची आघाडीची टेक कंपनी Samsung ही अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या बाबतीत Samsung चा जगातील सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे, आपल्या युजर्सच्या गोपनीयतेचे संपूर्ण संरक्षण व्हावे आणि या बाबातीत कोणत्याही प्रकारे तडजोड करावी लागू नये, यासाठी कंपनी नेहमी प्रयत्न करत असते. याच निमित्ताने Samsung ने आता एका अनोख्या स्पर्धेचे देखील आयोजन केले आहे. आपल्या सॉफ्टवेअरमधील प्रत्येक संभाव्य त्रुटी नियमित अंतराने दूर करण्यासाठी Samsung ने बग बाउंटी कार्यक्रम जाहीर केला आहे.
Samsung ने आपल्या नवीन बग बाउंटी कार्यक्रमांतर्गत जगभरातील हॅकर्स, हल्लेखोर, संशोधक आणि सायबर सुरक्षा तज्ञांना आपल्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधून ते हॅक करण्याचे आव्हान दिले आहे. असे करणाऱ्यांना Samsung कडून 8 कोटी रुपयांचे मोठे बक्षीस दिले जाणार आहे. Samsung ला असे वाटते की त्यांच्या सिस्टममध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्याा जाव्यात. त्यामुळे युजर्सची गोपनीयता पूर्णपणे संरक्षित केली जाईल. यासाठी Samsung ने जगभरातील हॅकर्सना आव्हान दिले असून त्या बदल्यात मोठे बक्षीसही जाहीर केले आहे. Samsung च्या या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश म्हणजे, जगभरातील Samsung युजर्सच्या वैयक्तिक डेटाची आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीची 100% सुरक्षितता सुनिश्चित करणे.
हेदेखील वाचा- 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लवकरच लाँच होणार iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro स्मार्टफोन
बग बाउंटी कार्यक्रमाबाबत माहिती देताना Samsung ने सांगितलं की, हॅकर्स, हल्लेखोर, संशोधक आणि सायबर सुरक्षा तज्ञ यांना Samsung च्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधून काढायच्या आहेत, ज्यामुळे कंपनीच्या सिस्टममध्ये अनियंत्रित कोड अंमलबजावणी समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या सिस्टम आणि सॉफ्टवेअरला हानी पोहोचू शकते आणि इतर प्रकारच्या सुरक्षा हॅक करणाऱ्या हॅकर्स किंवा संशोधकांना बक्षीस दिले जाईल. सॅमसंगला अनियंत्रित ऍप्लिकेशन इन्स्टॉलेशन, डेटा एक्सट्रॅक्शन, डिव्हाइसची सुरक्षा हॅक करणे किंवा डिव्हाइस अनलॉक करणे, पासवर्ड शोधणे इत्यादी बग शोधायचे आहेत.
Samsung ने बग बाउंटी प्रोग्रामचे मूल्य 10 लाख डॉलर म्हणजे सुमारे 8.4 कोटी रुपये केले आहे. नॉक्स वॉल्टच्या सुरक्षिततेला बायपास करून सॅमसंगच्या हार्डवेअर सुरक्षा प्रणालीमध्ये रिमोट कोड कार्यान्वित करणाऱ्या हॅकर किंवा संशोधकाला 8.4 कोटी रुपयांचे सर्वात मोठे बक्षीस दिले जाईल. नॉक्स वॉल्ट ही सॅमसंगने तयार केलेली स्वतःची सुरक्षा प्रणाली आहे.