Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
Samsung Galaxy A07 4G हा नवीन बजेट स्मार्टफोन इंडोनिशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G99 चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये IP54 रेटिंग देखील आहे.
Samsung Galaxy A07 4G हा स्मार्टफोन 4GB + 64GB, 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत IDR 13,99,000 म्हणजेच सुमारे 7,500 रुपये, 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत IDR 16,49,000 म्हणजेच सुमारे 8,900 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत IDR 19,49,000 म्हणजेच सुमारे 10,500 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत IDR 22,99,000 म्हणजेच सुमारे 12,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वायलेट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांना खरेदीवर IDR 7,19,700 म्हणजेच सुमारे 3,900 रुपयांपर्यंतचे बोनस देखील मिळू शकतात, ज्यामध्ये 25W ट्रॅव्हल अडॅप्टर बंडल, 36GB XL डेटा पॅकेज आणि सॅमसंग केअर+ वर 1–2 वर्षांसाठी 30 टक्के सूट समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy A07 4G मध्ये 6.7-इंचाचा HD+ (720×1,600 पिक्सेल) Infinity-U LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे. हँडसेट 6nm ऑक्टा-कोर MediaTek Helio G99 चिपसेटने सुसज्ज आहे. ज्यासोबत 8GB पर्यंत LPDDR5X रॅम देण्यात आली आहे.
यामध्ये 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देखील देण्यात आहे, ज्याला microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. डुअल-सिम (Nano+Nano) हँडसेट Android 15-बेस्ड One UI 7 वर चालतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फोनला 6 वर्षांसाठी ओएस अपग्रेड आणि 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळतील.
फोटो आणि व्हिडीओसाठी Samsung Galaxy A07 4G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेल सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सल सेंसर आहे.
नवीन Galaxy A07 4G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 4G, Bluetooth 5.3, GPS, Wi-Fi, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. या हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंग देखील आहे. त्याचे माप 164.4×77.4×7.6 मिमी आणि वजन 184 ग्रॅम आहे.