चीनची अनोखी टेक्नोलॉजी पाहून उडाले इतरांचे होश! पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही AI चॅटबोटने घातला धुमाकूळ, पहिलं मिशन केलं पूर्ण!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आता आपल्याला AI ची जादू पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण AI चा वापर करून आपली काम पूर्ण करत आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते ऑफीसला जाणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला AI बद्दल माहिती आहे. AI आपल्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. AI मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वीवर सर्वत्र AI ची जादू पसरली आहे. आता AI ने अंतराळात देखील त्याची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे.
पृथ्वीवर धुमाकूळ घालणारा AI आता अंतराळात देखील पोहोचला आहे. चीनने त्यांच्या तियांगोंग स्पेस स्टेशनमध्ये एक AI चॅटबोट डिप्लॉय केला आहे. हे AI चॅटबोट तिथे असलेल्या अंतराळविरांची मदत करणार आहे. या AI चे नाव Wukong AI असं ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात हे Wukong AI चॅटबोट लाँच करण्यात आले आहे. याने त्याचे पहिले मिशन देखील पूर्ण केले आहे. स्पेसवॉक दरम्यान अंतराळ स्थानकात उपस्थित असलेल्या अंतराळवीरांना Wukong AI ने आधार दिला आहे. हे अंतराळवीरांना नेव्हिगेशन आणि टेक्टिकल प्लॅनमध्ये मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Wukong AI एक ट्रेडिशनल चॅटबॉट आहे, ज्याला प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये एकूण दोन मॉड्यूल पाहिजे. यामधील एकाला स्पेसमध्ये इंस्टॉल करण्यात आले आहे, जे अंतराळातील कर्मचाऱ्यांना कठीण प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करते. दुसरे मॉड्यूल पृथ्वीवर आहे, जे विश्लेषण करतो. दोन्ही मॉड्यूल मिळून एक एडवांस्ड AI असिस्टेंटप्रमाणे काम करते. जे प्रत्येक अंतराळ मोहिमेनुसार स्वतःला अनुकूल करण्यास सक्षम आहे. ते 15 जुलै रोजी स्थापित करण्यात आले होते, परंतु त्याने या महिन्यातच त्याचे काम सुरू केले.
चीनमध्ये अंतराळविरातील ट्रेनिंग सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही सिस्टम गंभीर ऑपरेशन आणि कठीण समस्या सोडवण्यासाठी जलद आणि प्रभावी माहिती देऊ शकते. हे AI चॅटबॉट अंतराळवीरांची कार्यक्षमता वाढवते, त्यांना मानसिक आधार देते आणि जमिनीवरील टीम आणि अवकाश यांच्यात समन्वय राखते. चीनने आपल्या अंतराळ स्थानकावर एआय चॅटबॉट तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशांमध्ये अंतराळासाठी स्पर्धा वाढत असताना चीनने हे पाऊल उचलले आहे.
चीनच्या या यशाने सर्वांनाच चकित केले आहे. आता इतर देश देखील त्यांचे AI चॅटबॉट अंतराळात पाठवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. अलीकडेच चीनच्या एका AI चॅटबॉटवरून प्रचंड वाद निर्माण झाले होते. एका AI चॅटबॉटवरून वाद सुरु असतानाच आता दुसऱ्या एका चॅटबोटने अवकाशात झेप घेतली आहे. त्यामुळे आता केवश पृथ्वीवरच नाही तर अवकाशात देखील AI चॅटबॉटची जादू पाहायला मिळणार आहे.