Samsung Galaxy A17 4G: बजेट किंमतीत मिळणार दमदार फीचर्स, Samsung चा नवा 4G फोन लाँच! तब्बल 6 वर्षांपर्यंत मिळणार Android अपडेट्स
लोकप्रिय टेक ब्रँडने जर्मनीमध्ये त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A17 4G लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या 4G स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत केवळ 15 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने दावा देखील केला आहे की, या बजेट स्मार्टफोनला 6 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स दिले जाणार आहेत.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन बजेट स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G99 प्रोसेसरवर आधारित आहे. Galaxy A17 4G ला IP54 रेटेड बिल्ड मिळाला आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा 5G व्हेरिअंट कंपनीने ऑगस्ट महिन्यात भारतात लाँच केला आहे. त्यानंतर आता या स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगच्या जर्मनीमधील ऑफिशियल वेबसाइटवर नव्या Samsung Galaxy A17 4G ची किंमत आणि उपलब्धता याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ई-कॉमर्स वेबसाइट Gadgetsleo ने या स्मार्टफोनच्या 4GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटला KSH 22,400 म्हणजेच सुमारे 15,000 रुपयांच्या किंमतीत लिस्ट केलं आहे.
डुअल-सिम Samsung Galaxy A17 4G Android 15-बेस्ड One UI 7 वर आधारित आहे. सॅमसंगने दावा केला आहे की, या स्मार्टफोनला 6 वर्षांपर्यंत मेजर OS अपडेट्स आणि 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये जेमिनी लाईव्ह आणि सर्कल टू सर्च यांचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन बजेट हँडसेटमध्ये 6.7-इंच फुल HD+ (1,080×2,340 पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन मिळाले आहे.
Galaxy A17 4G MediaTek Helio G99 चिपसेटवर आधारित आहे, ज्याला 4GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. स्टोरेजला माइक्रोSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. संदर्भासाठी, त्याची 5G आवृत्ती Exynos 1330 चिपसेटवर चालते.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A17 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आले आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल मेन सेंसर, 5-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड-अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी बेस्ट आहे. Samsung Galaxy A17 4G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 18 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक टाईम देण्याचा दावा करते. त्याचा आकार 164.4 x 77.9 x 7.5mm आणि वजन 190 ग्रॅम आहे.
Galaxy A17 5G ची किंमत किती आहे?
Galaxy A17 5G ची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये आहे.
Galaxy A17 5G चे बॅटरी स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
यामध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.