Samsung Galaxy A17 5G: लेटेस्ट डिझाईन आणि परवडणारी किंमत! Samsung चा स्वस्त फोन युजर्सच्या भेटीला...किंमत 25 हजारांहून कमी
कोरियन टेक कंपनी आणि लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Samsung पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला. Samsung ने त्यांच्या A सीरीज अंतर्गत एक नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गॅलेक्सी A17 5G या नावाने लाँच करण्यात आला असून काही निवडक मार्केटमध्येच कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, लाँच करण्यात आलेला नवीन गॅलेक्सी A17 5G हा A16 5G चे अपग्रेड मॉडल असू शकते.
नव्या आणि बजेट डिव्हाईसमध्ये कंपनीने अनेक कमाल फीचर्स दिले आहेत. गॅलेक्सी A17 5G मध्ये सॅमसंगचा 5nm Exynos 1330 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Android 15 वर बेस्ड One UI 7 देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये युजर्सच्या स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी 90Hz रिफ्रेश रेट आहे. या डिव्हाईसमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिव्हाईसची किंमत 25 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे हा एक बजेट स्मार्टफोन आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर सॅमसंगच्या ऑल न्यू गॅलेक्सी A17 5G ची किंमत EUR 239 म्हणजेच सुमारे 24,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. सध्या हे डिव्हाईस ब्लॅक, ब्लू आणि ग्रे कलर ऑप्शनमध्य प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
Samsung च्या या नव्या डिव्हाईसमध्ये अँड्रॉइड 15 वर बेस्ड वन UI 7 देण्यात आला आहे. यासोबतच या बजेट फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये 5nm ऑक्टा-कोर Exynos 1330 चिपसेट आहे, ज्याच्यासोबत Mali-G68 MP2 GPU दिले जात आहे. सिक्योरिटीसाठी या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील फीचर्स आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये फोन में f/2.2 अपर्चरवाला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, डिव्हाइसमध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि 5,000mAh एमएएच बॅटरीचा पाठिंबा आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या बजेट डिव्हाईसच्या शोधात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे पण बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी हे डिव्हाईस बेस्ट आहे.