Price Drop: लाँचिंगनंतर महिनाभरातच घसरली Samsung च्या या बजेट स्मार्टफोनची किंमत, कंपनीने केली घोषणा! खरेदी करण्याची सुवर्णसंधी
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात क? जर हो, तर थांबा. आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. महिन्याभरापूर्वी लाँच झालेला स्मार्टफोन आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. होय, Samsung ने नुकत्याच लाँच झालेल्या त्यांच्या Samsung Galaxy A36 स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला हा बजेट स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Samsung Galaxy A36 स्मार्टफोन गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला आहे. खरंतर कंपनीने गेल्या महिन्यात तीन स्मार्टफोन लाँच केले होते. ज्यामध्ये Samsung Galaxy A26, Samsung Galaxy A36 आणि Samsung Galaxy A56 यांचा समावेश आहे. यापैकी आता कंपनीने Samsung Galaxy A36 च्या सर्व व्हेरिअंटच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. किंमतीत घट झाल्यामुळे, मार्चमध्ये लाँच झालेला फोन आता कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही Samsung प्रेमी असाल आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने घोषणा केली आहे की Samsung Galaxy A36 च्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती 2000 रुपयांनी कमी होतील. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन 2000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल. या फोनची प्रभावी किंमत किती आहे आणि त्यात कोणते स्पेसिफिकेशन दिले आहे, याबद्दल आता जाणून घेऊया.
Samsung ने 128 GB स्टोरेज आणि 8GB रॅम व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपयांपर्यंत कमी केली आहे, तर लाँचच्या वेळी या व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये इतकी होती. किंमतीत घट झाल्यामुळे फोनचा 256 GB+8GB व्हेरिअंट कंपनीच्या वेबसाइटवर 33,999 रुपयांना विकला जात आहे. त्याच वेळी, टॉप एंड म्हणजेच 256 GB+ 12GB व्हेरिअंट 36,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हा सॅमसंग फोन ऑसम ब्लॅक, ऑसम लॅव्हेंडर आणि ऑसम व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाइटव्यतिरिक्त, हा फोन रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरून खरेदी करता येईल. कंपनीने या किंमती कायमच्या कमी केल्या आहे.
Samsung Galaxy A36 मध्ये 6.7-इंचाचा sAMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 7+ चे संरक्षण आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2340 (FHD+) आहे.
कामगिरीसाठी त्यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर बसवण्यात आला आहे.
Samsung Galaxy A36 मध्ये 6 वर्षांच्या ओएस आणि सुरक्षा अपडेटसह अँड्रॉइड 15 आधारित वन यूआय 7 देखील आहे.
Samsung Galaxy A36 मध्ये मध्ये 50MP OIS प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि मागील बाजूस 5MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Galaxy A36 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP67 रेटिंग आणि स्टीरिओ स्पीकर्स आहेत.