Samsung च्या नव्या 5G फोनची भारतात एंट्री, फीचर्स वाचून बसेल धक्का! ऑफर्ससह खरेदी करा केवळ इतक्या किंमतीत
Samsung Galaxy M36 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन Galaxy M सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. नवीन Galaxy M सीरीज स्मार्टफोन 7.7mm थिन प्रोफाइलसह लाँच करण्यात आला आहे. हे नवीन डिव्हाईस Exynos 1380 चिपसेटने सुसज्ज आहे. फोनचे फीचर्स जबरदस्त आहेत. फोनमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे.
Samsung Galaxy M36 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत बँक ऑफर्ससह 16,499 रुपये आहे. 8GB + 128GB स्मार्टफोनच्या स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आहे. ग्राहकांना बँक ऑफर्सवर 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. हे ऑरेंज हेझ, सेरेन ग्रीन आणि वेल्वेट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. 12 जुलैपासून भारतात अमेझॉन, सॅमसंग इंडिया वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Samsung Galaxy M36 5G हा स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड One UI 7 आहे. सहा जनरेशन्सचे Android अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळण्याची पुष्टी आहे. फोनमध्ये 6.7-इंच फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सेल) Super AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट आहे. स्क्रीनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन आहे. हे Exynos 1380 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्याला 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – X)
फोटोग्राफीसाठी, Galaxy M36 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा यूनिट आहे. ज्याला 50-मेगापिक्सेल मेन सेंसर आहे. यामध्ये OIS सपोर्ट आहे. सेटअपमध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा देखील आहे. फ्रंटला फोनमध्ये 12-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. रियर आणि फ्रंट दोन्ही कॅमेरे 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
Galaxy M36 5G मध्ये अनेक AI इमेज एडिटिंग टूल्स देखील देण्यात आले आहेत. जसं की, ऑब्जेक्ट इरेजर, इमेज क्लिपर आणि एडिट सजेशन्स. या डिव्हाईसमध्ये गूगलचे सर्कल टू सर्च फीचर आणि AI सेलेक्ट देखील आहे. सिक्योरिटीसाठी यामध्ये Knox Vault फीचर आहे.
Samsung ने Galaxy M36 5G मध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.