Samsung Galaxy S24 FE: आतापर्यंतची सर्वात दमदार ऑफर! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Samsung चा हा स्मार्टफोन, अशी आहे डिल
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट म्हणजे सेल्सचा खजिना आहे. फ्लिपकार्टवर सतत ऑफर्स आणि डिस्काउंट शॉपिंग करण्याची संधी उपलब्ध असते. येत्या काहीच दिवसात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे आणि या दिवाळी सणानिमित्त फ्लिपकार्टने त्यांच्या प्लस आणि ब्लॅक मेंबरसाठी एक नवीन सेलची घोषणा केली आहे. हा सेल फ्लिपकार्ट बिग बँग दिवाली सेल 2025 या नावाने सुरू करण्यात आला आहे. फ्लिपकार्टने सुरु केलेल्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेट करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये प्रीमियम किमतीचे स्मार्टफोन्स देखील अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. ज्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल तरी देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आता प्रीमियम आणि तुमच्या मनासारखाच स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध असलेल्या एका स्मार्टफोन डीलबद्दल सांगणार आहोत. ही स्मार्टफोन ऑफर सॅमसंगबद्दल आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung galaxy s24 FE च्या खरेदीवर मोठ डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा स्मार्टफोन एक फॅन एडिशन मॉडेल आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रमियम फीचर्स देण्यात आले आहेत. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या दिवाळी सेलदरम्यान या स्मार्टफोनची किंमत तब्बल 30 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे ही एक जबरदस्त डील मानली जात आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन 32000 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला एक प्रीमियम शॉपिंग करण्याची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा या सेलमध्ये पूर्ण केली जाणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिल्स आणि ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया.
Samsung Galaxy S24 FE हा स्मार्टफोन भारतात 59,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्ट सेलमध्ये या स्मार्टफोनवर 29,000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 30,999 रुपये झाली आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत आणि ग्राहक एक्सचेंज ऑफर्सद्वारे 23,700 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळवू शकतात.
Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्यफोनमध्ये Samsung चा इन-हाउस Exynos 2400e चिपसेट देण्यात आला आहे, जो 8GB रॅमसह जोडण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. फोटोग्राफीसाठी, Galaxy S24 FE मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP चा अल्ट्रावाइड लेन्स आणि 8MP चा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.