
Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S25 Ultra च्या खरेदीवर हजारो रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. कंपनी लवकरच Galaxy S26 Ultra लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच आणि ख्रिसमसच्या मूहूर्तावर Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी बेस्ट आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर हजारो रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा, AMOLED स्क्रीन, शार्प डिझाइन आणि S Pen सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच हा स्मार्टफोन प्रिमियम फीचर्ससह त्यांच्या यूजर्सना बेस्ट एक्सपिरिअंस ऑफर केला जाणार आहे. सध्या हे डिव्हाईस फ्लिपकार्टवर 1,08,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगच्या या जबरदस्त ऑफरमुळे Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत अत्यंत कमी झाली आहे. या स्मार्टफोनची किंमत लाँच प्राईजपेक्षा 22,816 रुपयांनी कमी झाली आहे. या ऑफर आणि डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 1,07,183 रुपये झाली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 3,769 प्रति महिना पासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकतात. Axis Bank फ्लिपकार्ट डेबिट कार्ड आणि Flipkart SBI क्रेडिट कार्डवर कंपनी 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील ऑफर करत आहे. कंपनी या फोनवर जबरदस्त एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. ज्यामुळे तुम्हाला जुन्या डिव्हाईसवर 57,400 रुपयांपर्यंत एक्सचेंज वॅल्यू देखील मिळणार आहे. मात्र ही किंमत डिव्हाईसची कंडीशन आणि इतर गोष्टींवर अवलंबून असणार आहे. फ्लिपकार्ट अतिरिक्त पैसे देऊन या फोनवर विस्तारित वॉरंटी आणि इतर अॅड-ऑन देखील देत आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलयाचं झालं तर सॅमसंगच्या या डिव्हासईमध्ये 6.9-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल Snapdragon 8 Elite प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये कंपनीने 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिले आहे. Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड, 50MP पेरिस्कोप आणि 10MP टेलीफोटो लेंससह 3x ऑप्टिकल जूम सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP चा कॅमेरा आहे.
Ans: स्मार्ट कॅमेरा टूल्स, असिस्टंट, परफॉर्मन्स एआय फीचर्स.
Ans: हो, S-Pen सपोर्ट (काही मॉडेल्समध्ये इनबॉक्स/ऑप्शनल)
Ans: