सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा (१४.६-इंच) आणि टॅब एस१२+ (१२.६-इंच) मध्ये १६०० निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस असलेला डायनॅमिक एएमओएलईडी २एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील व्हिजन बूस्टर वैशिष्ट्य कोणत्याही प्रकाशात ब्राईटनेस आपोआप समायोजित करते. केवळ ५.१ मिमी स्लिम असलेला गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅब आहे, तर गॅलॅक्सी टॅब एस१२+ ची जाडी ५.३ मिमी आहे.
Freelancers आणि YouTubers सावधान! डॉलरची कमाई खात्यात हवी असेल तर ‘हा’ फॉर्म भरावा लागणार
दोन्ही डिवाइसेसमध्ये ऊर्जा-कार्यक्षम ३ एनएम प्रोसेसर दिला आहे, जो आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ६१% वेगवान एनपीयू, १९% वेगवान सीपीयू आणि १७% सुधारित जीपीयू पॉवर प्रदान करतो. यात अल्ट्रा मॉडेलवर २३ तासांपर्यंत आणि प्लस मॉडेलवर २१ तासांपर्यंत टिकणारी बॅटरी दिली आहे, जी ४५ वॅट अडॅप्टरने अवघ्या ९५ मिनिटांत १००% चार्ज होते. उष्णतेवर प्रभावी नियंत्रणासाठी यात नवीन ३डी व्हेपर चेंबर समाविष्ट आहे.
अँड्रॉइड १७ आणि वन यूआय ९ वर चालणाऱ्या या सिरीजमध्ये नोट असिस्ट, गुगल एआय प्रो (जेमिनायचा ६ महिन्यांचा ट्रायल) आणि सॅमसंग ब्राउझर यांसारखे गॅलॅक्सी एआय फीचर्स मिळतात. व्यावसायिक कामांसाठी अडोबी फोटोशॉप, गुडनोट्स (१ वर्ष मोफत), लुमाफ्युजन आणि क्लिप स्टुडिओ पेंट हे अॅप्स विशेष सवलतींसह उपलब्ध आहेत. पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षेसाठी या डिवाइसेसना आयपी६८ रेटिंग मिळाले असून, ७ वर्षांचे ओएस व सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.
गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्राची सुरुवातीची किंमत १,४९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ ची सुरुवातीची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रासाठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २७,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ साठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २६,४९९ रुपये आहे. दोन्ही मॉडेल्स – वाय-फाय आणि ५जी व्हेरिएंट्स, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी किंवा ५१२ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत – ७ ऑक्टोबरपासून सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, पार्टनर स्टोअर्स, सॅमसंगडॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होतील.
या सिरीजच्या खरेदीवर ग्राहकांसाठी अनेक विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सॅमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर १५,००० रुपयांपर्यंत सूट, निवडक वेअरेबल्सवर १५% सूट, प्रो कीबोर्ड कव्हरवर ३०% सूट, ५,००० रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस आणि प्रमुख बँक व एनबीएफसी भागीदारांद्वारे २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा समाविष्ट आहे.
सॅमसंगने टॅबलेट्ससाठी पहिल्यांदाच ‘गॅलॅक्सी फॉरएव्हर’ हा २ वर्षांचा प्रोग्राम सादर केला आहे. १२,४९९ रुपये किमतीच्या या पॅकद्वारे ग्राहक मूळ किमतीच्या ७५% रक्कम आणि प्रोग्राम फी २४ ईएमआयमध्ये भरून टॅब खरेदी करू शकतात. यामध्ये २४ महिन्यांच्या आत ४०% पर्यंत निश्चित बायबॅक मूल्यासह अपग्रेडचा पर्याय आणि २ वर्षांसाठी मोफत सॅमसंग केअर+ सुरक्षा समाविष्ट आहे.
Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर






