Samsung च्या ‘वॉक-ए-थॉन इंडिया’चे तिसरे एडिशन सुरु, विजेत्यांना Galaxy Watch8 वर मिळणार डिस्काऊंट कूपन
भारताच्या आघाडीच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन चॅलेंज आणलं आहे. हे चॅलेंज म्हणजेच वॉक-ए-थॉन इंडिया’चे तिसरे एडीशन. कंपनीने नुकतीच वॉक-ए-थॉन इंडियाच्या तिसऱ्या एडीशनची घोषणा केली आहे. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी अजूनही काही काळ शिल्लक आहे. मात्र या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेयी होणाऱ्या तीन भाग्यशाली विजेत्यांना Galaxy Watch8 मिळणार आहे. तर इतर सर्व सहभागी (फिनिशर्स) ना Galaxy Watch8 वर 15,000 रुपयांपर्यंत निश्चित सवलत कूपन मिळेल, असं देखील कंपनीने सांगितलं आहे. सॅमसंग हेल्थ अॅपवर ‘वॉक-ए-थॉन इंडिया’ चॅलेंजसाठी नोंदणी करून सहभागी होता येईल.
सॅमसंगच्या ‘वॉक-ए-थॉन इंडिया’च्या तिसऱ्या एडिशनची सुरुवात 25 ऑगस्टपासून होईल. या उपक्रमाचा उद्देश भारतातील लोकांना सक्रिय व आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा आहे. ही स्पर्धा केवळ भारतीय युजर्ससाठी आहे, अशी घोषणा देखील करण्यात आली आहे आणि 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. या 30 दिवसांच्या चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला एकूण 2,00,000 पावले चालून पूर्ण करावी लागतील, जेणेकरून ते रोमांचक बक्षिसांसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व सहभागी (फिनिशर्स) ना निश्चित बक्षिसे मिळतील, असं देखील कंपनीने सांगितलं आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या 3 भाग्यशाली विजेत्यांना नवीन Galaxy Watch8 मिळेल. तर इतर सर्व फिनिशर्सना 15,000 रुपयांपर्यंत सवलत कूपन मिळेल, जे Galaxy Watch8 खरेदीसाठी वापरता येईल.
हा चॅलेंज सॅमसंग हेल्थ अॅप वर विशेषरित्या आयोजित केला जाणार आहे, जो सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. सहभागी अॅपमधील रिअल-टाइम लीडरबोर्डवरून स्वतःची प्रगती पाहू शकतात, ज्यामुळे त्यांना समजेल की ते आतापर्यंत किती पाऊलं चालले आहेत. या चॅलेंजमध्ये पात्र होण्यासाठी 30 दिवसांत किमान 2,00,000 पावले चालणे आवश्यक आहे. चॅलेंज पूर्ण केल्यानंतर, फिनिशर्सना आपले बक्षीस 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान Samsung Members अॅपवर जाऊन क्लेम करावे लागेल.
Samsung Health हा एक जागतिक वेलनेस आणि जीवनशैली अॅप आहे, जो युजर्सना पावले, व्यायाम, कॅलोरी, रक्तदाब, ECG, झोपेचा नमुना इ. आरोग्यविषयक मेट्रिक्स ट्रॅक करण्याची सुविधा देतो. याचा उद्देश आहे आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे.
Galaxy Watch Ultraच्या कुशन डिझाइनवर आधारित ही नवीन घड्याळ केवळ 8.6 मिमी जाडीची असून संपूर्ण दिवसभर आरामदायक अनुभव देते. Google सोबत विकसित केलेली, ही पहिली स्मार्टवॉच आहे जी Wear OS 6 आणि Gemini AI असिस्टंट सोबत येते.