
Samsung W26 Launch: सॅमसंगचा लक्झरी धमाका! Galaxy Z Fold 7 चा सर्वात महागडा व्हेरिअंट लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क
हा स्मार्टफोन लाव आणि काळ्या रंगात सोनेरी रंगाच्या एक्सेंटसह येतो. यामुळे या नव्या स्मार्टफोनला एक वेगळा आणि प्रिमियम लूक देतो. या जबरदस्त लूकसह हे डिव्हाईस केवळ 215 ग्रॅम वजनाचे आहे. नुकत्यात लाँच झालेल्या W26 या स्मार्टफोनच्या सर्वात खास फीचरबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला सॅटेलाइट कॉलिंग आणि मेसेजिंगचा सपोर्ट मिळणार आहे. हे फीचर गॅलेक्सी Z फोल्ड 7 मध्ये दिलेलं नाही. सॅमसंगने या डिवाइसच्या पॅकेजिंगवरही विशेष लक्ष दिले आहे. (फोटो सौजन्य – X)
नवीन W26 एक यूनिक बॉक्समध्ये दिला जातो. या बॉक्समध्ये फोनसोबतच केवलर केस, चार्जिंग केबसहल एक चार्जर देखील दिला जात आहे. जो इतर डिव्हाईससोबत ऑफर केला जात नाही. परफॉर्मंसच्या बाबतीत देखील हे डिव्हाईस अतिशय जबरदस्त आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 512GB आणि 1TB स्टोरेज मॉडल यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन 16GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे. पण गॅलेक्सी Z फोल्ड 7 चा विचार केला तर कंपनीने हा स्मार्टफोन 512GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता ज्यामध्ये 12GB रॅमपर्यंत सपोर्ट देण्यात आला होता.
एवढंच नाही तर नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या W26 मध्ये गॅलेक्सी AI स्मार्ट कलेक्शन सारखे काही खास सॉफ्टवेयर फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हे फीचर यूजर्सना फोटो आणि टेक्स्ट एका डेडिकेटेड स्पेसमध्ये ड्रॅग करून अधिक कार्यक्षमतेने मॅनेज करण्यास अनुमती देते.
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर W26 च्या 512GB मॉडेलची किंमत CNY 16,999 म्हणजेच सुमारे 2,12,000 रुपये आणि 1TB मॉडेलची किंमत CNY 18,999 म्हणजेच सुमारे 2,36,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सॅमसंगची डब्ल्यू सीरीज आतापर्यंत चिनी बाजारपेठेपुरती मर्यादित होती. ही उपकरणे चिनी लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन डिझाइन केली गेली आहेत.