लोकप्रिय ट्रेंड Ghibli च्या नावाखाली होतेय लोकांची फसवणूक; स्कॅमर्स लोकांना पाठवत आहेत हे मॅसेज; अशा प्रकारे घ्या तुमची काळजी
दोन आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या Ghibli स्टाईल ईमेजचं वेड अजूनही लोकांमध्ये कायम आहे. लोक त्यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या Ghibli स्टाईल ईमेज पोस्ट करत आहेत. Ghibli स्टाईल ईमेजसोबतच लोकांमध्ये Ghibli गोन रॉंग असा देखील एक ट्रेंड सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये Ghibli स्टाईल ईमेज तयार करताना झालेल्या चुका दाखवल्या जात आहेत. मोठे नेते, कालाकार या सर्वांना Ghibli चं वेड लागल आहे. प्रत्येकजण सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांची Ghibli ईमेज अपलोड करत आहेत.
आता Ghibli स्टाईलच्या या क्रेझने स्कॅमर्सना आमंत्रिक केलं आहे. Ghibli च्या नावाखाली स्कॅमर्स लोकांना वेगवेगळे मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करत आहेत. ज्यामध्ये फ्री Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी एखाद्या प्लॅटफॉर्मचं नाव किंवा लिंक दिलेली असते. या लिंकवर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फोटोची Ghibli स्टाईल ईमेज मिळत नाही तर तुमची फसवणूक होते.याबाबत आता पोलिसांनी देखील अलर्ट जारी केला असून लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमर्स Ghibli च्या नावाखाली लोकांना खोटे ईमेल्स पाठवत आहेत. या ईमेल्समध्ये गिवअवे, इवेंट इनवाइट्स किंवा प्रमोशनल ऑफर यासांरख्या आकर्षक वस्तूंची लालच दाखवली जाते. या मेल्समध्ये मालवेयर लिंक किंवा फेक वेबसाइट्सच्या रीडायरेक्ट लिंक लपलेल्या असतात, जे तुमची ओळख चोरी करतात. ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकंत, शिवाय तुमची फसवणूक देखील केली जाऊ शकते.
स्कॅमर्स अशा लोकांना टार्गेट करत आहेत जे “फ्री Ghibli वॉलपेपर”, “स्क्रीनसेवर” किंवा “एनिमेशन पॅक” डाउनलोड करत आहेत. साइबर सेल सांगितलं आहे कि यामध्ये रॅनसमवेयर आणि स्पाइवेयर लपलेला असू शकतो, जो तुमच्या फोन किंवा कंप्यूटरला लॉक करू शकतो आणि ब्राउजरमधील माहिती चोरू शकतो.
याशिवाय स्कॅमर्स तुमच्या फोटोमधून डिपफेक देखील तयार करू शकतात. जर तुम्ही Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी एखाद्या फ्री वेबसाईटला भेट दिली आणि तिथे तुमचा फोटो अपलोड करत असाल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. इंटरनेटवर अशा अनेक खोट्या वेबसाईट आहेत ज्या लोकांची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. या वेबसाईट फ्रीमध्ये Ghibli ईमेज तयार करण्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात या वेबसाईट लोकांची फसवूक करत असतात. जर तुम्ही या वेबसाईटवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड केला तर त्याचा वापर डीपफेकसाठी केला जाऊ शकतो.