Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल अरेस्टसाठी तयार केलं चक्क बनावट कोर्ट! खोट्या कॉलने झाली सुरुवात आणि वृद्धाने गमावले लाखो रुपये

ऑनलाईन स्कॅमच्या रोज नवीन घटना उघडकीस येत आहेत. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. कुठे खोटे कॉल्स आणि मेसेज करून तर कुठे खोटी लिंक पाठवून लोकांना फसवलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2025 | 01:09 PM
डिजिटल अरेस्टसाठी तयार केलं चक्क बनावट कोर्ट! खोट्या कॉलने झाली सुरुवात आणि वृद्धाने गमावले लाखो रुपये

डिजिटल अरेस्टसाठी तयार केलं चक्क बनावट कोर्ट! खोट्या कॉलने झाली सुरुवात आणि वृद्धाने गमावले लाखो रुपये

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅमर्स लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. यातीलच एक पद्धत म्हणजे डिजीटल अरेस्ट. आतापर्यंत डिजीटल अरेस्टची अनेक प्रकरण समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये स्कॅमर्स खोटे पोलीस ऑफीसवर बनवून लोकांना फसवतात, त्यांच्यावर खोटे आरोप करतात आणि पैसे उकळतात. आता समोर आलेल्या प्रकरणामुळे सर्वचजण हादरून जाणार आहेत.

Price Dropped: Oppo च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 13,000 रुपयांचं डिस्काऊंट! 50MP प्रायमरी कॅमेऱ्याने सुसज्ज, डिल मिस करू नका

नेमकं काय घडलं?

जयपुरच्या मानसरोवर परिसरात डिजीटल अरेस्टची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी स्कॅमर्सनी वृद्धाला फसवण्यासाठी चक्क बनावट कोर्ट तयार केलं आहे. या घटनेत स्कॅमर्सनी वृद्धावर मनी लॉड्रिंगचा खोटा आरोप लावला आणि तीन दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्ट ठेवलं. शिवाय मानसिक छळ देखील केला. या संपूर्ण प्रकरणानंतर घाबरून वृद्धाने स्कॅमर्सना तब्बल 23 लाख रुपये दिले.  (फोटो सौजन्य – Pinterest)

बनावट पोलीसांचा फोन आणि असा सुरु झाला स्कॅम

ही घटना 23 मे रोजी सकाळी 9:44 वाजण्याच्या सुमारास घडली. वृद्ध व्यक्तिला अनोळखी नंबरवरून दोन फोन आले. यातील एका व्यक्तिने दावा केला की तो मुंबईच्या कोलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी संजय कुमार आहे. या व्यक्तिने दावा केला की, वृध्द व्यक्तिचा मोबाईल नंबर 2.8 करोड रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाशी जोडलेला आहे. वृद्ध व्यक्तिच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचेही फोनवरील व्यक्तिने सांगितले.

तयार केलं बनावट कोर्ट

कथित संजय कुमार नावाच्या फोनवरील व्यक्तिने वृद्ध व्यक्तिचे आणखी एका स्कॅमरसोबत बोलणं करून दिलं. या दुसऱ्या व्यक्तिने सीबीआई अधिकारी रोहित कुमार गुप्ता असल्याचा दावा केला. दोघांनी मिळून त्या वृद्धाला पटवून दिले की त्यांच्या करण्यात आलेले आरोप खरे आहेत. यानंतर दोन्ही स्कॅमर्सनी वृद्ध व्यक्तिला घाबरवण्यासाठी एक व्हिडिओ कॉल केला ज्यामध्ये एक बनावट न्यायालयीन दृश्य दाखवण्यात आले ज्यामध्ये एक न्यायाधीश वृद्ध व्यक्तिचे सर्व बँक खाते गोठवण्याचा आदेश देत होता.

अशा प्रकारे वृद्धाने गमावेल 23 लाख रुपये

स्कॅमर्सनी वृद्धाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांना 3 दिवस डिजीटल अरेस्ट केलं, शिवाय मानसिक छळ देखील केला. यानंतर वृद्ध व्यक्तिने स्कॅमर्सच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर केले. थोडे – थोडे करून तब्बल 23.56 लाख रुपये ट्रांसफर करण्यात आले. जेव्हा वृद्ध व्यक्तिने स्कॅमर्सना सांगितले की त्यांच्याकडे आता पैसे नाहीत, तेव्हा स्कॅमर्सनी त्यांना 20 लाखांची एफडी तोडण्यास सांगितलं.

Upcoming Smartphones: Moto पासून Tecno पर्यंत… जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार या जबरदस्त स्मार्टफोनची विक्री

अशा प्रकारे उघकीस आलं संपूर्ण प्रकरण

जेव्हा वृद्ध व्यक्ती एफडी तोडण्यासाठी बँकेत गेली तेव्हा मॅनेजरला काहीतरी गडबड आढळली. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर बँकेने ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवले. यानंतर, 26 मे रोजी शिप्रापथ पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आणि सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला.

सावध रहा, सतर्क रहा

  • स्कॅमर्सकडून आलेल्या बनावट कॉल्सना बळी पडू नका.
  • पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी संस्था कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नाहीत.
  • कोणत्याही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरीत त्याबाबत सायबर क्राईम हेल्पलाइनवर तक्रार करा.

Web Title: Scammers made fake court for digital arrest read how old man lost twenty three lakhs tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
1

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
3

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
4

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.