Price Dropped: Oppo च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 13,000 रुपयांचं डिस्काऊंट! 50MP प्रायमरी कॅमेऱ्याने सुसज्ज, डिल मिस करू नका
जबदरस्त कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज असलेल्या Oppo Reno 12 वर बेस्ट डिल ऑफर केली जात आहे. ही डिल म्हणजे नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची आणि मोठ्या प्रमाणात बचत करण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही फोटोग्राफीसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Oppo Reno 12 एक चांगला पर्याय ठरणार आहे. Oppo Reno 12 स्मार्टफोनवर तब्बल 13 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म फ्लिपकार्टवर तुम्हाला या डीलचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे.
X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन
Flipkart वर Oppo Reno 12 स्मार्टफोनवर धमाकेदार डील ऑफर केली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या फोनवर उपलब्ध असलेल्या सर्व डील आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Oppo Reno 12 स्मार्टफोन भारतात 32,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या फोनवर सध्या जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात असून फ्लिपकार्टवर त्याची किंमत 20,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर 12,000 रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. फ्लिपकार्टवर बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. यासोबतच, खरेदीदार त्यांचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
डिस्प्ले: Oppo Reno 12 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1200 निट्स आहे. फोनचा डिस्प्लेला Gorilla Glass Victus 7i प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.
प्रोसेसर आणि बॅटरी: Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300-Energy प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला (OIS) सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेंसरसह 2 मेगापिक्सची मॅक्रो कॅमेरा लेंस देखील देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पोच्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
AI फीचर्स: Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये चांगल्या यूजर एक्सपीरियंससाठी अनेक AI फीचर्स जसं की AI Best Face, AI Writer, AI Recording Summary, AI Eraser 2.0 आणि AI Studio देण्यात आले आहेत.