(फोटो सौजन्य-AI एआय)
संशोधन आणि टेक्नोलॉजीवर हस्तांतरणावर भर
हा करार केवळ व्यावसायिक सहकार्यापुरता मर्यादित नसून Applied Research, Technology Transfer, Prototyping आणि Pilot Projects यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. युनिवर्सिटीज आणि बिझनेसेसमधील सहकार्य वाढवणे, नव्या कल्पनांना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित करणे आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करणे यावरही भर दिला जाणार आहे. अशा सहकार्यामुळे संशोधनातून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाला प्रत्यक्ष बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळू शकतो.
शारजाहकडे जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून पाहण्याची संधी
WTITC शी जोडलेल्या जागतिक तेलुगू तंत्रज्ञान समुदायासाठी शारजाह संशोधन, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्तारासाठी संभाव्य केंद्र म्हणून समोर येत आहे. या नेटवर्कमध्ये तंत्रज्ञ, टेक कंपन्या, उद्योजक आणि नवोन्मेषकांचा समावेश असल्याने दोन्ही बाजूंना कौशल्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवता येऊ शकते. स्टार्टअप्सना नवीन बाजारपेठा, भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय संपर्क मिळण्याची शक्यता या करारामुळे वाढते.
SRTIP येथे झाला करार
या सामंजस्य करारावर Sharjah Research Technology and Innovation Park (SRTIP) येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. SRTIP चे Chief Strategy Officer डॉ. Fareed Mahmoud Abdalla Alameeri आणि WTITC चे Chairman Sundeep Kumar Makthala यांनी करारावर स्वाक्षरी केली. Sundeep Makthala यांच्या मते, या भागीदारीमुळे तंत्रज्ञान, संशोधन, प्रतिभा, ज्ञान आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूंना व्यासपीठ मिळणार आहे.
छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी खुशखबर! Amazon Pay-Kotak चे खास क्रेडिट कार्ड लॉन्च
या सहकार्यामुळे शारजाहच्या तंत्रज्ञान एकोसिस्टमला जागतिक तेलुगू समुदायाशी जोडण्याचा प्रयत्न जास्त मजबूत होणार आहे. भविष्यात संयुक्त संशोधन, पायलट प्रकल्प आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण यामधून प्रत्यक्ष परिणाम दिसण्याची अपेक्षा आहे.






