बोर्ड परीक्षांच्या काळात तासनतास अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने आणि योग्य नियोजनाने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते.
टॉपर्स नेहमी अभ्यासाचे अचूक नियोजन करतात. दिवसाच्या सुरुवातीलाच कोणता विषय किती वेळ वाचायचा हे ठरवले जाते. सक्तीचे किंवा कठीण वेळापत्रक बनवण्याऐवजी व्यावहारिक प्लॅनिंग ठेवावी. अभ्यासाच्या वेळी मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि नोटिफिकेशनमुळे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणूनच अभ्यास सुरू करण्यापूर्वी फोन सायलेंट करून दूर ठेवावा. यामुळे एकाग्रता टिकून राहते आणि वेळेचा अपव्यय होत नाही.
केवळ पुस्तके वाचत राहिल्याने सर्वकाही लक्षात राहते असे नाही. एक टॉपिक वाचल्यानंतर पुस्तक बंद करून स्वतःला प्रश्न विचारावे आणि तो भाग स्वतःच्या शब्दांत लिहून काढावा. यामुळे कोणता भाग समजला आणि कुठे अडचण आहे हे स्पष्ट होते. तसेच, बोर्ड परीक्षेत वेळेत उत्तर लिहिण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका आणि सॅम्पल पेपर सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला वेळेचे बंधन न ठेवता आणि नंतर ठराविक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव करावा.
सतत न थांबता अभ्यास करणे किंवा उशिरापर्यंत जागी राहणे योग्य नाही. अभ्यासादरम्यान मेंदूला विश्रांती देण्यासाठी लहान ब्रेक घेणे गरजेचे आहे. यामुळे थकवा जाणवत नाही आणि पुन्हा नव्या ऊर्जेने अभ्यास करता येतो. याशिवाय, पुरेशी झोप घेतल्यास वाचलेले विषय लक्षात ठेवणे सोपे जाते आणि परीक्षेच्या काळात आत्मविश्वासाने सामोरे जाता येते.
UGC Net 2026: यूजीसी नेट अर्जदारांसाठी खूशखबर! करेक्शन विंडो सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा बदल
Ans: नाही, फक्त जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा अचूक नियोजन आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणे अधिक प्रभावी ठरते.
Ans: अभ्यास सुरू करताना मोबाईल फोन सायलेंट करून दूर ठेवावा आणि अभ्यासाचे व्यावहारिक वेळापत्रक बनवावे.
Ans: जुन्या प्रश्नपत्रिका आणि सॅम्पल पेपर सोडवल्यामुळे वेळेचे व्यवस्थापन समजते आणि परीक्षेतील आत्मविश्वासात वाढ होते.






