Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

Smartphone Tips: स्मार्टफोनची रॅम पावरफुल आहे, मात्र तरी देखील सतत स्मार्टफोन हँग होत आहे का? याची कारण वेगवेगळी असू शकतात. जसे की, स्टोरेज, प्रोसेसर, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर. या समस्येवरील उपाय शोधण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 02, 2026 | 08:27 AM
Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेरा, रॅम आणि बॅटरी या तीन प्रमुख गोष्टींवर अधिक भर
  • स्मार्टफोनची रॅम पावरफुल असताना देखील डिव्हाईस हँग का होते?
  • प्रोसेसर, स्टोरेजची स्पीड, सॉफ्टवेयर ऑप्टिमाइजेशन आणि बॅकग्राउंड सुरु असणारे अ‍ॅप्स स्मार्टफोनचा परफॉर्मंस ठरवतात
 

नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेरा, रॅम आणि बॅटरी या तीन प्रमुख गोष्टींवर अधिक भर दिला जातो. 8GB, 12GB किंवा 16GB रॅम असलेला स्मार्टफोन अधिक चांगला मानला जातो. हे स्मार्टफोन्स हँग होत नाहीत, असं अनेकांना वाटतं. पण खरंच असं असतं का? कारण अनेकदा दमदार रॅम असलेल्या स्मार्टफोनमध्ये देखील हँग होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी स्मार्टफोन स्लो होतात, स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स व्यवस्थित काम करत नाहीत. अशावेळी यूजर्सच्या मनात येणारा प्रश्न म्हणजेच स्मार्टफोनची रॅम पावरफुल असताना देखील डिव्हाईस हँग का होते? रॅम दमदार असताना देखील स्मार्टफोनचा परफॉर्मंस खराब का होतो? चला तर मग आज याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

केवळ रॅमवर अवलंबून नसतो स्मार्टफोनचा परफॉर्मंस

स्मार्टफोनची स्पीड केवळ रॅमवर अवलंबून नसते. तर स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे प्रोसेसर, स्टोरेजची स्पीड, सॉफ्टवेयर ऑप्टिमाइजेशन आणि बॅकग्राउंड सुरु असणारे अ‍ॅप्स स्मार्टफोनचा परफॉर्मंस ठरवतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये फास्ट रॅम असेल मात्र प्रोसेसर जुना असेल तर डिव्हाईसचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

स्टोरेजची समस्या असू शकते

जर तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनल स्टोरेज फुल झाले असेल स्मार्टफोन स्लो होऊ शकते. सिस्टिमला टेम्पररी फाइल्स, अ‍ॅप डेटा आणि कॅशसाठी स्टोरेजची आवश्यकता असते. स्टोरेज फुल झाले असेल आणि स्पेस खूप कमी असेल तर अ‍ॅप उघडण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. यामुळे स्मार्टफोन स्लो होऊ शकतो.

बॅकग्राऊंड अ‍ॅप्समुळे वाढतो लोड

अनेकदा असं देखील घडतं की, बॅकग्राऊंडमध्ये चालणाऱ्या अ‍ॅप्समुळे देखील फोनच्या परफॉर्मंसवर परिणाम होतो आणि फोन स्लो होतो. सोशल मीडिया, मेसेजिंग, क्लाऊड बॅकअप आणि लोकेशनसारख्या सर्विस फोनच्या रिसोर्सचा वापर करतात. यामुळे रॅम आणि प्रोसेसर दोन्हीवर जास्तीचा भार पडू शकतो.

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

कशी सोडवाल स्मार्टफोन समस्या?

  • फोनमध्ये पुरेसे स्टोरेज रिकामे ठेवा.
  • नको असलेले अ‍ॅप्स फोनमधून काढून टाका.
  • बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अनावश्यक अ‍ॅप्स बंद करा.
  • सिस्टिम आणि अ‍ॅप्स नेहमी अपडेट ठेवा.
या टिप्स फॉलो करून देखील स्मार्टफोन हँग होत असेल तर समस्या केवळ रॅमची नाही तर स्टोरेज, प्रोसेसर, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरसंबंधित देखील असू शकते.

Web Title: Smartphone has powerful ram but still keeps hanging again and again here are some reasons hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
1

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
2

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
3

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
4

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.