Sony Xperia 10 VII: भारतात लाँच होणार नाही Sony चा हा लेटेस्ट स्मार्टफोन, काय आहे कारण? जाणून घ्या
जापानी टेक जायंट कंपनीने शुक्रवारी Sony Xperia 10 VII लाँच केला आहे. हँडसेट कंपनीने निवडक बाजारात लाँच केला. जगभरातील अनेक देशांमध्ये या हँडसेटची विक्री केली जाणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या हँडसेटबाबत आता एक अपडेट समोर आली आहे. Sony Xperia 10 VII इतर देशांसह भारतामध्ये देखील लाँच केले जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Sony Xperia 10 VII ची सुरुवातीची किंमत EUR 399 म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आणि GBP 449 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट पांढऱ्या, पिरोजा आणि चारकोल ब्लॅक रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. सुरुवातीला, हा फोन यूके, युरोपियन युनियन (EU) आणि जपानसारख्या निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल. Sony चा हा नवीन स्मार्टफोन 12 सप्टेंबरपासून निवडक देशांमध्ये सोनीच्या अधिकृत रिटेल स्टोअर्स आणि वेबसाइटद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. तसे, Sony Xperia 10 VII हा यूके आणि ईयूमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Sony Xperia 10 VII इतर देशांमध्ये लाँच झाल्यानंतर आता हा स्मार्टफोन भारतात देखील लाँच होणार का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, हा नवा आणि लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लाँच होणार नाही. याचं कारण म्हणजे Sony ने देशातील स्मार्टफोन व्यवसाय आधीच बंद केला होता.
Sony Xperia 10 VII एक डुअल-सिम (Nano + eSIM) स्मार्टफोन आहे, जो Android 15 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.1-इंच फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सेल) OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सँपलिंग रेट आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट आहे. समोर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण देखील दिले आहे.
हँडसेट Snapdragon 6 Gen 3 चिपसेटवर आधारित आहे, ज्याला 8GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. या डिव्हाईसमध्ये कंपनीने MicroSD कार्ड स्लॉट देखील दिला आहे, जो यूजर्सना 2TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा देतात. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5,000mAh बॅटरी दिली आहे.
फोटोग्राफीसाठी, कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.9) 1/1.56-इंच Exmor RS सेंसर आहे, ज्यामधये 24mm फोकल लेंथ आणि 84-डिग्री फील्ड ऑफ व्यू आहे, ज्याला 13-मेगापिक्सेल (f/2.4) 1/3-इंच सेकेंडरी लेंससह जोडण्यात आलं आहे, ज्यामध्ये 16mm फोकल लेंथ आणि 123-डिग्री फील्ड ऑफ व्यू आहे. फ्रंटला, Sony Xperia 10 VII मध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.0) 1/4-इंच सेल्फी कॅमेरा आहे, ज्यामध्ये 26mm फोकल लेंथ आणि 78-डिग्री फील्ड ऑफ व्यू आहे.
कनेक्टिविटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये वायफाय 6E, ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि गूगल कास्ट सपोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट अनलॉक करण्यासाठी यात फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP65 आणि IP68 रेटिंग आहेत. स्मार्टफोनचे परिमाण 153×72×8.3 मिमी आहेत आणि त्याचे वजन सुमारे 168 ग्रॅम आहे.