
John Cena फॅन्ससाठी अनोखं सरप्राईज! Google वर नाव टाइप करताच स्क्रीनवर दिसेल खास इफेक्ट, आत्ताच करा ट्राय
टेक कंपनी गुगल नेहमीच त्यांच्या यूजर्ससाठी नवीन आणि खास सरप्राईज घेऊन येत असते. आता अशाच एका सरप्राईजबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही जर गुगलवर एखाद्या विषयाबाबत माहिती सर्च केली तर तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळे रिझल्ट पाहायला मिळतात. काही रिझल्ट एवढे फनी असतात की युजर्सचं हसू थांबता थांबत नाही. गुगलने नवीन वर्षानिमित्त पुन्हा एकदा यूजरसाठी असंच एक खास सरप्राईज आणल आहे. जेव्हा तुम्ही गुगलवर नवीन वर्ष किंवा एखाद्या खास प्रसंगाबद्दल सर्च करता तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर अतिशय मजेदार रिझल्ट्स पाहायला मिळतात. याबाबत सर्वांनाच माहित आहे. पण हा लेख विशेषतः जॉन सेना फॅन्ससाठी आहे. गुगलने जॉन सेना फॅन्ससाठी एक मजेदार अपडेट जारी केलं आहे. या अपडेटमुळे फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (फोटो सौजन्य – गुगल)
जर तुम्ही गुगलवर WWE चे लोकप्रिय रेसलर John Cena चे नाव सर्च केले तर तुम्हाला स्क्रीनवर अतिशय मजेदार रिझल्ट पाहायला मिळणार आहे. गुगल सर्चमध्ये रेसलरचं नाव टाईप करताच तुम्हाला संबंधित रिझल्ट्ससोबतच स्क्रीनवर खालील बाजूला एक हिरव्या रंगाच हात दिसणार आहे. तुम्ही हातावर क्लिक करताच स्क्रीनवर तुम्हाला सर्वात आधी John Cena ची लोकप्रिय सिग्नेचर मुव्हमेंट पाहायला मिळणार आहे. ही सिग्नेचर मुव्हमेंट यू कान्ट सी मी नावाने ओळखली जाते. यानंतर क्षणातच स्क्रीनवरील सर्व रिझल्ट गायब होणार आहेत आणि तुम्हाला संपूर्ण स्क्रीन रिकामी दिसणार आहे. गुगलचे हे अपडेट यूजर्सना प्रचंड आवडलं आहे. केवळ जॉन सेनाच नाही तर तुम्हाला गुगलवर वेगवेगळे शब्द सर्च केल्यानंतर देखील मजेदार रिझल्ट पाहायला मिळणार आहेत.
Free Fire Max: एक चूक आणि गेम संपला! ‘या’ कारणांमुळे बॅन होऊ शकतं तुमचं गेमिंग अकाऊंट, सावध व्हा
गुगल सर्चमध्ये जर तुम्ही 67 टाईप केले तर तुम्हाला संपूर्ण स्क्रीन हलताना दिसणार आहे. खरं तर हा गुगलद्वारे केला जाणार एक प्रँक आहे. सर्च केल्यानंतर यूजर्सना वाटते की त्यांच्या स्क्रीनमध्ये एखादी समस्या आली आहे किंवा काही गडबड आहे. पण असं नाही. हा प्रँक गूगलने केला आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. याशिवाय जर तुम्ही गुगल सर्चमध्ये ‘do a barrel roll’ टाईप केले तर तुम्हाला स्क्रीन दोन ते तीन वेळा गोल फिरताना दिसणार आहे. तुम्हाला वाटेल की स्क्रीन खराब होत आहे. तथापि, दोन किंवा तीन वेळा फिरवल्यानंतर, ती त्याच्या मूळ स्थितीत परत येईल.
Ans: John Cena हे प्रसिद्ध WWE रेसलर, हॉलीवूड अभिनेता आणि टीव्ही होस्ट आहेत.
Ans: 23 एप्रिल 1977 रोजी John Cena चा जन्म झाला.
Ans: 16 वेळा WWE वर्ल्ड चॅम्पियन.