Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा
टेक कंपनी Xiaomi ने चीनमध्ये त्यांचे एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे डिव्हाईस Xiaomi Watch 5 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने फ्लॅगशिप Xiaomi 17 Ultra, Xiaomi 17 Ultra Leica Edition आणि Buds 6 सह चीनमध्ये Xiaomi Watch 5 लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले हे नवीन स्मार्टवॉच टेक फर्मच्या लाइनअपमधील लेटेस्ट एडिशन आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सीजन मॉनिटरिंग आणि ECG ट्रॅकिंग सारखे अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये एक EMG सेंसर देखील आहे, जे स्मार्टवॉचला यूजरची मसल हेल्थ मॉनिटर करण्याची सुविधा देणार आहे. सध्या हे स्मार्टवॉच कंपनीच्या वेबसाईटवर चार वेगवेगळ्या रंगात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
Xiaomi Watch 5 हे स्मार्टवॉच एकाच आकारात लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 15,000 रुपये आहे. तसेच Xiaomi Watch 5 च्या eSIM व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिअंट सध्या शाओमी चायना ऑनलाईन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने स्मार्टवॉच ब्लॅक फ्लोरोएलास्टोमर स्ट्रॅप, खाकी ग्रीन फ्लोरोपॉलीमर स्ट्रॅप, गोल्ड आणि ब्राउन जेनुइन लेदर स्ट्रॅप आणि सॉफ्ट ब्लू जेनुइन लेदर स्ट्रॅप (चीनमधून भाषांतरित) कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi Watch 5 launches on 25th December alongside the Xiaomi 17 Ultra. – Snapdragon W5 Processor
– Xiaomi’s first EMG sensor
– ECG Heart rate sensor
– Double sided artificial Sapphire glass
– Stainless steel unibody case https://t.co/zUVKdPjUzl pic.twitter.com/ntHwazp6Om — Mukul Sharma (@stufflistings) December 22, 2025
Xiaomi Watch 5 मध्ये 1.54-इंच अॅमोलेड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 312 ppi पिक्सेल डेंसिटी, 480×480 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 1,500 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. यामध्ये एक सर्कुलर डायल आहे, ज्यामध्ये बाजूला एक रोटरी क्राउन आणि एक नेविगेशन बटन आहे. हेल्थ ट्रैकिंग फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ब्लड-ऑक्सीजन लेवल मॉनिटरिंग आणि ECG ट्रॅकिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
हे फीचर इनेबल करण्यासाठी Xiaomi च्या Watch 5 मध्ये एक हार्ट रेट सेंसर, एक SpO2 सेंसर, एक ECG सेंसर आणि एक EMG सेंसर आहे. कंपनीने दावा केला आहे की, EMG सेंसरसह उपलब्ध असलेली ही पहिली स्मार्टवॉच आहे, जी यूजर्सच्या मसल हेल्थ मॉनिटर करण्यासाठी मदत करते. ऑनबोर्ड सेंसरच्या लिस्टमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक जायरोस्कोप, एक जियोमॅग्नेटिक सेंसर, एक बॅरोमेट्रिक प्रेशर सेंसर आणि एक एम्बिएंट लाइट सेंसर देखील समाविष्ट आहे.
कनेक्टिविटी ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर, Xiaomi Watch 5 या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये वायफाय, eSIM, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, बेईडो, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि OZSS देण्यात आले आहे. Xiaomi Watch 5 हे अँड्रॉईड 8 किंवा त्यापुढील आणि iOS 14 आणि त्यापुढील वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईससोबत सुसंगत आहे. यात 930mAh लिथियम-आयन बॅटरी देखील आहे. हे स्मार्टवॉच 47x47x12.3mm मोजते आणि त्याचे वजन अंदाजे 56 ग्रॅम आहे.
Ans: 2010 साली Lei Jun यांनी Xiaomi ची स्थापना केली.
Ans: 2014 मध्ये Xiaomi ने भारतात प्रवेश केला.
Ans: Android-आधारित HyperOS (पूर्वी MIUI).






