भारतातील एंट्री झाली कन्फर्म! मंथली प्लॅन्सच्या अपेक्षित किंमतही आल्या समोर! Elon Musk चा Starlink देणार रॉकेटसारखी स्पीड
भारत सरकारने स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीला हिरवा कंदील दाखवला आहे. म्हणजेच आता लवकरच भारताच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. भारतात स्टारलिंकची सेवा सुरु करण्यासाठी मान्यता मिळावी, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून एलन मस्क प्रयत्न करत होता. त्याच्या प्रयत्नांना अखेर आता यश आलं आहे. कारण भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. स्टारलिंकला भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT) कडून सॅटकॉम लाइसेंससाठी “लेटर ऑफ इंटेंट” देण्यात आलं आहे. याचा अर्थ आता लवकरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु केली जाणर आहे.
स्टारलिंक एलन मस्कची स्पेस कंपनी SpaceX चा एक महत्त्वाचा भाग आहे. ही कंपनी जगभरात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देते. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (जीएमपीसीएस) लाइसेंसची वाट बघत होती. मिळालेल्या माहितीनुसार, Starlink ने भारताच्या डेटा सुरक्षा कायदा, निरीक्षण नियम आणि कंट्रोल सेंटरच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
पंतप्राधन नरेंद्र मोदी यांची एलन मस्कसोबत झालेली चर्चा आणि SpaceX चया टीमची वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेली भेट यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता भारतातील कानाकोपऱ्यात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. या कंपनीच्या एंट्रीमुळे आता भारतातील टेलिकॉम क्षेत्रात एक नवीन स्पर्धक आला आहे. भारतात काही अशी ठिकाणं आहेत जिथे ब्रॉडबँड किंवा मोबाइल नेटवर्कची सुविधा पोहोचू शकत नाही. अशा भागांसाठी स्टारलिंकची सेवा एक नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टारलिंक भारतात अनेक नवीन मंथली प्लॅन्स सुरु करू शकतो, ज्यांची किंमत 3,000 रुपये ते 4,200 रुपये प्रति महिना असू शकते. “रेजिडेंशियल लाइट प्लॅन” सुमारे 3000 रुपये प्रति महिना किंमतीत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 23-100 Mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा ऑफर केला जाऊ शकतो. Starlink चा वापर करण्यासाठी एक खास हार्डवेयर किट देखील खरेदी करावं लागणार आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 17 हजार रुपये असू शकते. तर स्टँडर्ड किटची किंमत 33,000 रुपये असू शकते. मोठ्या व्यवसायांसाठी फ्लॅट हाई-परफॉर्मेंस किटची किंमत 2.3 लाख रुपये असू शकते.
स्टारलिंकचा सर्वात मोठा फायदा हा असणार आहे की, ते लो-अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट्सद्वारे काम करते. ज्यामुळे इंटरनेट स्पीड अधिका फास्ट आणि लेटेंसी कमी होते. 2025 च्या अखेरपर्यंत स्टारलिंकची सेवा भारतात सुरु केली जाऊ शकते. ज्यामुळे भारतात एक डिजीटील क्रांती घडणार आहे.