India Pakistan War: पाकिस्तानचे लोकं सध्या Google वर काय सर्च करत आहेत? धक्कादायक गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष प्रचंड वाढला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये हल्ले – प्रतिहल्ले सुरु आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने त्यांच्या देशाला केला जाणारा पाणीपुरवठा बंद केला. यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली. या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे आणि अशांततेचे वातावरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने 8 मे रोजी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले परतून लावले आणि त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या सुरु असलेल्या या परिस्थितीचा लाहोर विमानतळासारख्या प्रमुख ठिकाणांवर मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षा एजन्सींनी विमानतळावर देखरेख वाढवली आहे आणि काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सध्या सुरु असणाऱ्या या परिस्थितीबाबत पाकिस्तानी लोकं गुगलवर सतत काही ना काही सर्च करत आहेत. आता अशाच काही टॉप ट्रेंडी टॉपिक्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबाबत पाकिस्तानात सर्वाधिक सर्च केलं जात आहे.
इंटरनेट मीम, सिंदूर की किंमत – ड्रामा सिरीज, 2025 पहलघाम हल्ला, इंग्रजीत सिंदूरचा अर्थ काय आहे, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय, सिंदूर म्हणजे काय, सिंदूरचा अर्थ काय आहे, मुझफ्फराबाद शहर, भारताची मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, मुरीदके – पाकिस्तानमधील शहर, कोटली – शहर, भारतीय हल्ला, भारतीय क्षेपणास्त्र हल्ला, आज क्षेपणास्त्र हल्ला, पाकिस्तान क्षेपणास्त्र हल्ला, भारताचे क्षेपणास्त्र प्रक्षेपण, पांढरा ध्वज, ध्वज, भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ, पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यासांरखे अनेक टॉपिक्स सध्या पाकिस्तानात सर्च केले जात आहेत.
याशिवाय, युद्धातील पांढरा ध्वज, पाक भारत युद्धाच्या ताज्या बातम्या, पाक विरुद्ध भारत युद्ध अपडेट्स, पांढरा ध्वजाचा अर्थ काय, भारताने युद्ध घोषित केले, भारत पाकिस्तान आज युद्ध, युद्ध अपडेट,आरवाय न्यूज लाईव्ह, लाहोर विमानतळ, भारताचा पाकिस्तानवर हल्ला, भारताचा बहावलपूरवर हल्ला, भारताचा पाकिस्तानवर हल्ला आज, भारताचा बहावलपूरवर क्षेपणास्त्र हल्ला, भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला, भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला हे टॉपिक्स देखील पाकिस्तानात ट्रेंडमध्ये आहेत.