Free Fire Max: गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह, अशी क्लेम करू शकता Dual Might ग्लू वॉल स्किन
फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप नावाचा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे युजर्स ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन आणि मून केक ग्लू वॉल स्किन एक्सेस करू शकणार आहेत. हा फ्री फायर मॅक्समधील एक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये रिवॉर्ड्स क्लेम करणं प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी असलेली डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत आणि स्पिन करावं लागणर आहे. प्रत्येक स्पिनेवेळी तुम्हाला या ईव्हेंटमधील एक रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. 7 वेळा स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना गेममध्ये मिळणार ग्रँड प्राईज क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेला हा स्टेप अप ईव्हेंट गेमर्ससाठी आठवडाभर सुरु राहणार आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये अनेक ग्लू वॉल स्किन्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. ग्लू वॉल स्किन्स या ईव्हेंटचे ग्रँड प्राईज आहे. या यादीमध्ये ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन आणि मून केक ग्लू वॉल स्किन इत्यादींचा समावेश आहे. ग्लू वॉल स्किनव्यतिरिक्त देखील या ईव्हेंटमध्ये अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Free Fire Max)






