Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने गॅलेक्सी एक्सआर हेडसेट ऑक्टोबर 2025 गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंटमध्ये लाँच केले आहे. हे डिव्हाईस दक्षिण कोरियातील टेक जायंट कंपनीचे पहिले एक्सटेंडेड रियलिटी (XR) हेडसेट म्हणून लाँच करण्यात आले आहेत, जे रियल वर्ल्डमध्ये Augmented Reality (AR) एलिमेंट्सना दोन इन-बिल्ट लेंसद्वारे दाखवते. या डिव्हाईसमध्ये हँड ट्रॅकिंगची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स खाली देण्यात आलेल्या सेन्सरमुळे हाताच्या हावभावांनी विजेट्स आणि अॅप्स नियंत्रित करू शकता. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये Qualcomm Snapdragon XR2+ Gen 2 चिपसेट, 16GB रॅम, आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे डिव्हाईस Android XR प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
Realme GT 8 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच! Ricoh GR Optics आणि 7000mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स
Samsung Galaxy XR हेडसेटची किंमत अमेरिकेत 1,799 डॉलर म्हणजेच सुमारे 1,58,000 रुपये आणि दक्षिण कोरियामध्ये KRW 2,690,000 म्हणजेच सुमारे 1,65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंग या डिव्हाईसच्या खरेदीवर 12 महिन्यांचे EMI ऑप्शन देखील ऑफर करत आहे, जिथे युजर्स हे डिव्हाईस 149 डॉलर म्हणजेच सुमारे 13,000 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी करू शकणार आहेत. सध्या हे डिव्हाईस केवळ अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये खरेदासाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये Silver Shadow कलर सादर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगच्या या जबरदस्त Galaxy XR मध्ये तुम्हाला मायक्रो-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 27 मिलियन पिक्सेल, 3,552×3,840 रेजोल्यूशन आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या स्क्रीनमध्ये 95% DCI-P3 कलर गॅमट, 109° हॉरिजॉन्टल आणि 100° वर्टिकल फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने या डिव्हाईसमध्ये Google Gemini AI असिस्टेंटसह मल्टी-कॅमेरा सेटअप देखील दिला आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये दोन पास-थ्रू कॅमेरा, सहा वर्ल्ड-फेसिंग ट्रॅकिंग कॅमेरा, चार आई-ट्रॅकिंग कॅमेरा आणि Iris Recognition सिक्योरिटी फीचर देखील दिले आहे. ऑडियोसाठी या डिव्हाईसमध्ये दोन – वे स्पीकर सेटअप आणि सहा माइक्रोफोन एरे उपलब्ध आहेत. कनेक्टिविटीसाठी या हेडसेटमध्ये Wi-Fi 7 और Bluetooth 5.4 चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याची बॅटरी लाईफ 2 तास आणि व्हिडीओ प्लेबॅक टाईम 2.5 तास आहे. हेडसेटह यामध्ये एक्सटर्नल बॅटरी पॅक देखील दिला जात आहे.
या डिव्हाईसचे वजन केवळ 545 ग्रॅम आणि बॅटरी पॅकचे वजन 302 ग्रॅम आहे. सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर हेडसेट नवीन एआर आणि एक्सआर अनुभव देते आणि विशेषतः गेमिंग, मल्टीमीडिया आणि इंटरॅक्टिव्ह अॅप्लिकेशन्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे.