Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?
पावरफुल परफॉर्मंसच्या बाबतीत Samsung Galaxy S25 Ultra, S24 Ultra आणि S23 Ultra हे तिन्ही स्मार्टफोन लोकप्रिय आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला गॅलेक्सी एस25 अल्ट्रा हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा सॅमसंगचा सर्वात एडवांस फोन असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय S24 Ultra आणि S23 Ultra हे स्मार्टफोन्स देखील त्यांच्या युजर्सना उत्तम फीचर्स ऑफर करतात. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट ठरणार, याबाबत तुम्ही देखील गोंधळले आहात का? आता तुमचा हा गोंधळ दूर होणार आहे.
सॅमसंगच्या तिन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर अॅमेझॉनवर सर्वोत्तम डिल उपलब्ध आहे. Galaxy S23 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 79,749 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनची लाँच किंमत 1,49,999 रुपये होती. Galaxy S24 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 75,749 रुपये झाली आहे, तर याची लाँच किंमत 1,29,999 रुपये होती. Galaxy S25 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 1,02,490 रुपये झाली आहे, तर याची लाँच किंमत 1,29,999 रुपये होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये
Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. 200MP प्राइमरी + 12MP अल्ट्रा-वाइड + 10MP टेलीफोटो + 10MP पेरिस्कोप असे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
फोनमध्ये 6.8-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 2600 निट्स ब्राइटनेस आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. 200MP प्राइमरी, 50MP पेरिस्कोप, 12MP अल्ट्रा-वाइड, 10MP टेलीफोटो असे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये 6.9-इंच Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 2600 निट्स ब्राइटनेस आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. 200MP प्राइमरी, 50MP पेरिस्कोप, 50MP अल्ट्रा-वाइड, 10MP टेलीफोटो असे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
जर तुम्ही Galaxy S24 Ultra आणि S23 Ultra यापैकी एक निवडत असाल तर तुम्ही Galaxy S24 Ultra निवडाल. यात एक शक्तिशाली प्रोसेसर, एक परिष्कृत कॅमेरा सिस्टम आणि एक उत्तम डिझाइन यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. दरम्यान, Galaxy S25 Ultra हे नवीनतम मॉडेल आहे, जे सर्वात प्रगत आहे आणि त्याची किंमत देखील जास्त आहे. जर तुम्ही बजेटबद्दल जागरूक असाल, तर हे मॉडेल विचारात घ्या.