Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडने चौथ्या तिमाहीमध्ये सर्व विभागांत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. मार्च २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारातील प्रवासी वाहनांची विक्री ६६,१९२ युनिट्स इतकी झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2026 | 05:41 PM
टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडने चौथ्या तिमाहीमध्ये सर्व विभागांत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. मार्च २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारातील प्रवासी वाहनांची विक्री ६६,१९२ युनिट्स इतकी झाली, जी मार्च २०२५ मधील ५१,६१६ युनिट्सच्या तुलनेत २८% वाढ दर्शवते. तिमाहीत देशांतर्गत विक्री १,९८,७४३ युनिट्सवर पोहोचली, जी २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील १,४६,१२७ युनिट्सच्या तुलनेत ३६% अधिक आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २६ साठी देशांतर्गत विक्री ६,३१,३८७ युनिट्स झाली, म्हणजेच आर्थिक वर्ष २५ मधील ५,५३,५८५ युनिट्सच्या तुलनेत १४% वाढ झाली आहे.

 

आंतरराष्ट्रीय व्यवसायात (आयबी) देखील लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च २०२६ मध्ये विक्री ७७९ युनिट्सवर पोहोचली, जी मार्च २०२५ मधील २५६ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २०४% वाढ आहे. तिमाहीतील आंतरराष्ट्रीय व्यवसायात विक्री २,६२५ युनिट्स झाली (आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाहीमधील ८७२ युनिट्सच्या तुलनेत २०१% वाढ), तर आर्थिक वर्ष २६ साठी विक्री १०,२०० युनिट्सवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष २५ मधील २,६७८ युनिट्सच्या तुलनेत २८१% वाढ दर्शवते.

एकूण प्रवासी वाहनांची विक्री (इलेक्ट्रिक वाहनांसह) मार्च २०२६ मध्ये ६६,९७१ युनिट्स झाली, जी मार्च २०२५ मधील ५१,८७२ युनिट्सच्या तुलनेत २९% वाढ आहे. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीमध्ये एकूण विक्री २,०१,३६८ युनिट्सवर पोहोचली, म्हणजेच आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीमधील १,४६,९९९ युनिट्सच्या तुलनेत ३७% वाढ. वार्षिक स्तरावर आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण विक्री ६,४१,५८७ युनिट्स झाली, जी आर्थिक वर्ष २५ मधील ५,५६,२६३ युनिट्सच्या तुलनेत १५% अधिक आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) विक्रीतही दमदार कामगिरी दिसून आली. मार्च २०२६ मध्ये इव्ही विक्री ९,४९४ युनिट्स झाली, जी मार्च २०२५ मधील ५,३५३ युनिट्सच्या तुलनेत ७७% वाढ आहे. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीमध्ये इव्ही विक्री २६,९३१ युनिट्स झाली (आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीमधील १५,९३६ युनिट्सच्या तुलनेत ६९% वाढ), तर आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण इव्ही विक्री ९२,१२० युनिट्सवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष २५ मधील ६४,२७६ युनिट्सच्या तुलनेत ४३% वाढ दर्शवते.

कंपनीचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “या वर्षात पीव्ही उद्योगाची विक्री सुमारे ४.७ दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी वर्षागणिक ८% वाढ दर्शवते. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत उद्योगाने दमदार पुनरागमन करत दुहेरी अंकातील वाढ नोंदवली, ज्याला जीएसटी २.० ची अंमलबजावणी आणि सणासुदीच्या हंगामातील मजबूत मागणीचा आधार मिळाला. ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाबाबतची पसंती अधिक वाढली असून, सीएनजी वाहनांची विक्री सुमारे २०% वार्षिक दराने वाढली, तर इव्ही विक्रीने २ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला. या वाढीमागे इव्हीबाबत वाढलेला ग्राहकांचा विश्वास आणि सर्व प्रमुख ओईएमकडून नवीन उत्पादनांचे लाँचिंग हे घटक कारणीभूत ठरले.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्ससाठी आर्थिक वर्ष २६ हे अनेक टप्पे गाठणारे ऐतिहासिक वर्ष ठरले. आम्ही ६.४ लाखांहून अधिक युनिट्सची आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री नोंदवली, जी उद्योगापेक्षा जास्त १५% वार्षिक वाढ दर्शवते. सहामाहीत वाहन नोंदणीनुसार आम्ही उद्योगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा प्रवेश केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विक्री १०,००० युनिट्सहून अधिक झाली. सीएनजी विभागात आमच्या पर्यावरणपूरक पॉवरट्रेनमुळे १.७ लाखांहून अधिक विक्री (२४% वार्षिक वाढ) झाली. इव्ही क्षेत्रात आम्ही आमचे नेतृत्व अधिक बळकट करत ४३% वार्षिक वाढीसह ९२,००० हून अधिक युनिट्सची विक्री नोंदवली. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीत आम्ही २ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडत आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही विक्री साध्य केली, जी ३७% वार्षिक वाढ दर्शवते. या तिमाहीत इव्ही विक्रीतही विक्रमी कामगिरी करत सुमारे २७,००० युनिट्सची विक्री (६९% वार्षिक वाढ) झाली.

पहिल्या सहामाहीमध्ये नेक्‍सॉन आणि पंच हे सर्वाधिक विक्री झालेले एसयूव्ही मॉडेल्स ठरले, ज्यातून आमच्या एसयूव्ही पोर्टफोलिओची ताकद स्पष्ट होते. हॅचबॅक सेगमेंटमधील उद्योगापेक्षा जास्त वाढ ग्राहकांची पसंती दर्शवते. सिएरा, सुधारित पंच तसेच हॅरियर आणि सफारीच्या पेट्रोल व्हर्जन्सना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, जो बुकिंग, चौकशी आणि डिलिव्हरीमध्ये दिसून येतो.

पुढील काळात एसयूव्ही, सीएनजी आणि इव्ही विभागातील वाढीमुळे उद्योगाची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे राहील. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आर्थिक वर्ष २७ मध्येही अर्धवार्षिकमधील मजबूत गतीवर आधारित उद्योगापेक्षा जास्त वाढ साध्य करण्यास उत्सुक आहे, ज्याला नवीन उत्पादनांची पाइपलाइन आणि मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा आधार मिळेल.”

Web Title: Tata motors passenger vehicles limited has sold a large number of vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • pune news
  • Tata Moters
  • tata motors news

संबंधित बातम्या

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
1

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
2

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
3

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप
4

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.