Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: असली – नकली चार्जरमध्ये गोंधळलात? सरकारचं हे अ‍ॅप तुम्हाला करेल मदत, वाचा संपूर्ण प्रोसेस

आपला चार्जर खराब झाला किंवा बिघडला तर आपण बाजारातून दुसरा विकत घेतो. बनावट चार्जरमुळे स्मार्टफोन खराब होतो. बनावट चार्जरचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून बनावट चार्जर ओळखू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 25, 2024 | 10:34 AM
Tech Tips: असली - नकली चार्जरमध्ये गोंधळलात? सरकारचं हे अ‍ॅप तुम्हाला करेल मदत, वाचा संपूर्ण प्रोसेस

Tech Tips: असली - नकली चार्जरमध्ये गोंधळलात? सरकारचं हे अ‍ॅप तुम्हाला करेल मदत, वाचा संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

आपण स्मार्टफोन खरेदी करतो, तेव्हा काही स्मार्टफोन्स सोबत आपल्याला चार्जर दिला जातो. तर काही स्मार्टफोन्सचा चार्जर आपल्याला खरेदी करावा लागतो. चार्जर खरेदी करताना तो चार्जर असली आहे की नकली यामध्ये अनेकवेळा आपला गोंधळ उडतो. नकली चार्जरमुळे आपल्या स्मार्टफोनचं नुकसान होऊ शकतं. तसेच नकली चार्जरमुळे ब्लास्ट झाल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असली आणि नकली चार्जर ओळखावा कसा, यासाठी अनेकजण गोंधळलेलं आहेत. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारच्या अ‍ॅपच्या मदतीने केवळ एका क्लिकवर असली आणि नकली चार्जर ओळखू शकता. पण यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. बाजारात खऱ्या चार्जरप्रमाणे दिसणारे अनेक चार्जर उपलब्ध आहेत. पण यातून तुम्हाला खरा चार्जर ओळखायचा आहे, जो तुमच्या स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम ठरू शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)

आपला चार्जर खराब झाला किंवा बिघडला तर आपण बाजारातून दुसरा विकत घेतो. पण आपण विकत घेतलेला चार्जर कंपनीच्या ओरिजीनिल ब्रँडचा आहे की नकली आहे, हेच आपल्याला माहीत नसत. कंपनीच्या ब्रँडच्या नावाखाली अनेक लोकं नकली चार्जर विकत असतात. पण या बनावट चार्जरमुळे आपला स्मार्टफोन तर खराब होतोच शिवाय चार्जरचा स्फोट होण्याची देखील शक्यता असते. ज्यामुळे आपल्या जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आता या सर्व घटना टाळण्यासाठी आणि ग्राहकांना असली आणि नकली चार्जरमधील फरक कळावा, यासाठी सरकारने एक अ‍ॅप लाँच केलं आहे. बीआयएस केअर असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप तुम्हाला बनावट चार्जर ओळखण्यासाठी मदत करणार आहे.

बीआयएस केअर ॲप आहे तरी काय?

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) हे बीआयएस केअर ॲपचे मालक आहेत. बीआयएस केअर ॲप भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. बीआयएस ही भारतात विकल्या जाणाऱ्या मालाची गुणवत्ता प्रमाणीकरण संस्था आहे.

बीआयएस केअर ॲप कसे डाऊनलोड कराल?

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • बीआयएस केअर ॲप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. अँड्रॉईड युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून तर आयओएस युजर्स ॲपल स्टोअरवरून हा ॲप डाऊनलोड करू शकतात.
  • खऱ्या आणि बनावट चार्जरमधील फरक ओळखण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
  • खऱ्या आणि बनावट चार्जरमधील फरक ओळखण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला बीआयएस केअर ॲप तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करावा लागेल.
  • आता तुम्हाला ॲपमध्ये दिसणाऱ्या Verify R no. under CRS वर टॅप करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर किंवा उत्पादनाचा QR कोड स्कॅन करून खरा किंवा बनावट चार्जर ओळखू शकता.
  • यानंतर तुम्ही चार्जरचे नाव, प्रोडक्ट कॅटेगारी, चार्जर कोणत्या देशात बनवला आहे, इंडियन स्टँडर्ड नंबर आणि मॉडेल तपासू शकाल.

अशा प्रकारे शोधा प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर

तुम्ही नवीन चार्जर खरेदी करता तेव्हा त्यावर प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर आणि QR कोड दोन्ही रेकॉर्ड केले जातात. पण तुम्ही खरेदी करत असलेल्या चार्जरवर प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर आणि QR कोड नसेल तर तो चार्जर नकली असल्याचे समजते. प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर XXXXXXX फॉरमॅटमध्ये सुरू होते.

Web Title: Tech guide how to know the difference between original and fake charger use bis care app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 10:34 AM

Topics:  

  • smartphone charger
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.