boAt ने लाँच केले बजेट फ्रेंडली ईयरबड्स, प्रिमियम लूक आणि जबदरस्त ऑडियो क्वालिटी केवळ इतक्या किंमतीत
BoAt ने त्यांचे नवीन BoAt Nirvana X TWS इयरबड्स लाँच केले आहेत. LDAC कोडेक, 60ms लो लेटेंसी आणि अशा अनेक जबरदस्त फीचर्ससह BoAt Nirvana X TWS ईयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी CES 2025 कार्यक्रमात इअरबड्स पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आले होते. आता हे इअरबड्स वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर करण्यात आले आहेत आणि त्यांची किंमतही खूपच कमी आहे.
चॅटजीबीटीचे गुगलला आव्हान! आता ChatGPT Search वापरण्यासाठी युजर्सना लॉगिन करावे लागणार नाही
BoAt Nirvana X TWS ऑनलाईन शॉपिंग प्लॅटॉफॉर्म अमेझॉन इंडियावर 2,799 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहे. तथापि, फ्लिपकार्टवर त्यावर ‘कमिंग सून’ असे लेबल आहे. हे इअरबड्स चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गॅलेक्टिक रेड, कॉस्मिक ओनिक्स, मिस्ट ब्लू आणि स्मोकी अॅमेथिस्ट यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – X)
BoAt Nirvana X TWS मध्ये हायफाय साउंडसह नोल्स-पावर्ड ड्युअल ड्रायव्हर्स आहेत. हे 10 मिमी ड्रायव्हर्स आहेत आणि कंपनीचे म्हणणे आहे की हे दोन्ही नोल्स-इनेबल्ड ड्राइवर तुमच्या इअरबड्समधील लिसनिंग कर्वसोबत फ्रीक्वेंसी रिस्पांसला एक एन्जॉयएबल ऑडियो एक्सपीरियंससाठी रेसिप्रोकेट करते.
LDAC कोडेक सपोर्ट एकूण अनुभव आणखी वाढवतो. हे घरातील आणि बाहेरील क्लियर कम्युनिकेशनसाठी चार माइकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस पावर्ड नॉइज कँसिलेशनला समर्थन देते. याशिवाय, ते Mimi च्या BoAt अॅडॉप्टिव्ह EQ ला देखील एकत्रित करतात जिथे तुम्हाला मिमी टेक्नॉलॉजीजच्या अॅडॉप्टिव्ह EQ सह पर्सनलाइज्ड लिसनिंगची सुविधा मिळू शकते. तुम्ही तुमचे प्रोफाइल सेट करू शकता आणि हियरिंग प्रोफाइल क्रॅक न करता चित्रपट, सीरीज आणि पॉडकास्ट ऐकू शकता.
एडिशनल फीचर्समध्ये BoAt स्पेशियल ऑडिओ, इन-इअर डिटेक्शन, गुगल फास्ट पेअर आणि एकाच वेळी दोन डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटी समाविष्ट आहे. वापरकर्ते प्रीसेट EQ मोड्समध्ये टॉगल करण्यासाठी, बॅटरी स्टेटस मॉनिटर करण्यासाठी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तपासण्यासाठी, टच फंक्शन्समध्ये बदल करण्यासाठी, फीचर्स सक्रिय किंवा निष्क्रिय करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी BoAt हिअरेबल्स अॅप वापरू शकतात. बड्स IPX5 रेटेड आहेत.
ऑडिओ: नोल्स-पावर्ड 10 मिमी ड्युअल ड्रायव्हर्स, boAt HiFi साउंड, LDAC, स्पेशियल ऑडियो
अॅडॉप्टिव्ह ईक्यू: boAt अॅडॉप्टिव्ह ईक्यू (मिमी) सह पर्सनलाइज्ड साउंड ट्यूनिंग
कॉल क्लॅरिटी: नॉइज-फ्री कॉल्ससाठी चार माइकसह AI-ENx टेक
बॅटरी: 40 तासांपर्यंत प्लेबॅक आणि फास्ट चार्जिंग
गेमिंग: लॅग-फ्री गेमिंगसाठी बीस्ट मोड
स्मार्ट वैशिष्ट्ये: इन-इअर डिटेक्शन, मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटी, गुगल फास्ट पेअर, फाइंड माई ईयरबड्स
टिकाऊपणा: IPX5-रेटेड स्वेट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस
Gemini 2.0 Flash Thinking: Google चं नवीन AI मॉडल लाँच, जाणून घ्या खास फीचर्स
अॅप सपोर्ट: कस्टमायझेशन आणि हियरिंग प्रोफाइल सेटअपसाठी boAt Hearables अॅप
व्हेलेटांईन डे निमित्त BoAt ने एक विशेष ऑफर सुरु केली आहे, ज्यामध्ये युजर्सना काही निवडक ईअरबड्सच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. शिवाय साऊंड बार आणि स्मार्टवॉचच्या खरेदीवर देखील कंपनी ग्राहकांना विशेष डिस्काऊंट देत आहे. त्यामुळे व्हेलेंटाईननिमित्त तुम्हाला तुमच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला काही खास गिफ्ट द्यायचे असतील तर BoAt ची ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.