(फोटो सौजन्य: Pinterest)
जगभरात ओळखले जाणारे गुगल हे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सर्च इंजिन आह. इथे तुम्ही आपल्या हवी असलेली कोणतीही माहिती सर्च करू शकता. जगभरात अनेक सर्च इंजिन्स अस्तित्वात आहेत मात्र आजवर गुगलच्या बरोबरीला कोणीही आलेलं नाही अशातच आता गुगलला खुले आवाहन देण्यासाठी चॅटजीबीटी मार्केटमध्ये उतरला आहे. वास्तविक, यानुसार आता युजर्सना एक नवीन खास फिचर दिले जाणार आहे जे युजर्सच्या फायद्याचे ठरणार आहे. चॅटजीबीटीच्या या नवीन फिचरमध्ये युजर्सना नक्की काय मिळेल आणि हे कसे काम करेल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
OpenAI गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या एआय मॉडेल्समध्ये सर्च इंजिन फिचर लाँच केले. कंपनीने याला ChatGPT Search असे नाव दिले आहे. या फीचरच्या माध्यमातून गुगल सर्चला टक्कर देण्याची कंपनीची योजना आहे. ओपनएआयने यापूर्वी ही सर्व्हिस चॅटजीपीटी प्लस सब्स्क्रायबर्ससाठी ऑफर केली होती. काही महिन्यांपूर्वी कंपनीने हे फीचर सर्व यूजर्ससाठी फ्री केले होते. त्यातच आता OpenAI ने आणखी एक मोठे अपडेट दिले आहे.
जगातील सर्वात छोटे फोन! अंगठ्याहून लहान आहे या Phones चा आकार
युजर्सना लॉगिनशिवाय वापरू शकतात नवीन फिचर
ChatGPT Search वापरण्यासाठी लॉगिनची आवश्यकता नाही. या नव्या स्टेपमुळे OpenAI ने यूजर्सना मोठा दिलासा दिला आहे. असे मानले जाते की कंपनी लॉगिनशिवाय सर्च फीचरमध्ये प्रवेश करून Google Search शी स्पर्धा करण्याचा विचार करत आहे.
ChatGPT Search कोण युज करू शकतं?
OpenAI ने X (पूर्वीचे Twitter) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये घोषणा केली की सर्व युजर्स आता लॉग इन न करता ChatGPT शोध वापरू शकतात. या अपडेटनंतर, युजर्सना त्यांच्या चॅटजीपीटीमध्ये सर्च फिचर वापरण्यासाठी ईमेल आयडी किंवा इतर पर्सनल डिटेल्स एंटर करण्याची आवश्यकता नाही. याचा सर्वाधिक फायदा अशा लोकांना होईल ज्यांना त्यांचे डिटेल्स शेअर न करता हे फिचर वापरायचे आहे. ChatGPT शोध आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फिचर chatgpt.com वर कोणत्याही लॉगिनशिवाय वापरले जाऊ शकते.
Valentine’s Day Special: ॲपलचे युजर्सना खास गिफ्ट, आता iPhone मधून करता येईल ‘हे’ काम
AI-पावर्ड सर्च रिजल्ट्स:
युजर्स AI-पावर्ड अन्सर्स आणि वेब सोर्ससह समरी वाचू शकतात
इमेज आणि रेटिंग:
या प्लॅटफॉर्मवर, युजर्सना केवळ टेक्स्ट आधारित रिजल्ट्स मिळत नाहीत तर इमेज, रेटिंग आणि मॅप डायरेक्शन देखील मिळते
विश्वसनीय माहिती:
Google प्रमाणे, ChatGPT Search देखील विविध स्त्रोतांकडून माहिती गोळा करते
स्पीड आणि वापरण्याची सोपी पद्धत:
ChatGPT Search फिचर आता साइन-इन शिवाय वापरले जाऊ शकते
ChatGPT Plus युजर्सना घेता येईल खास फीचर्सचा लाभ
ChatGPT शोध आता सर्व युजर्ससाठी विनामूल्य उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते ChatGPT Plus स्बस्क्रायबर्ससाठी काही विशेष फायदे देणार आहे.
गुगलला टक्कर देणार ChatGPT Search?
ChatGPT Search हे फिचर सर्व युजर्ससाठी विनामूल्य झाल्यानंतर, ते Google आणि Bing सारख्या शोध इंजिनांशी स्पर्धा करेल. ओपनएआयचे हे फिचर प्रथम प्रभावी एआय ब्राउझर म्हणून पाहिले जात आहे. हे युजर्सना त्यांच्या प्रश्नांची अचूक माहिती देण्याचे काम करेल.