7 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला Lava चा हा स्मार्टफोन! मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी Lava ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Lava Yuva 4 भारतात लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन आहे, यामध्ये Unisoc T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 7 हजारांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये AnTuTu स्कोअर 230,000 पेक्षा जास्त आहे. स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. याशिवाय, यात 8MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष गोष्ट म्हणजे Lava Yuva 4 स्मार्टफोनचं डिझाईन काही प्रमाणात आयफोन 16 प्रो सारखेच आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही Lava Yuva 4 स्मार्टफोनचा विचार करू शकता. तुम्हाला 7 हजारांहून कमी किंमतीत आयफोन 16 प्रो सारखे प्रिमियम डिझाईन आणि कमाल फीचर्स मिळणार आहेत. फोनला दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच आले आहेत. सध्या, ग्राहक हा स्मार्टफोन केवळ ऑफलाइन रिटेलर्सकडूनच खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Lava Yuva 3 मध्ये अपग्रेड म्हणून Yuva 4 लाँच केले गेले आहे, जे फेब्रुवारीमध्ये देशात लाँच झाले होते. Lava Yuva 3 स्मार्टफोनच्या फीचर्समध्ये काही बदल करून हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. चला Lava Yuva 4 स्मार्टफोनच्या फीचर्सवर नजर टाकूया.
Lava Yuva 4 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Lava Yuva 4 च्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत अद्याप समोर आलेली नाही. हा स्मार्टफोन ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी ब्लॅक कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
ग्राहक हा फोन देशातील ऑफलाइन रिटेलर्सद्वारेच खरेदी करू शकतील. कंपनीने म्हटले आहे की रिटेल फर्स्ट स्ट्रॅटेजी म्हणजे ग्राहकांना एक अनोखा रिटेल अनुभव देणे. Lava Yuva 4 सह ग्राहकांना एक वर्षाची वॉरंटी मिळेल. मोफत होम सर्व्हिसिंग देखील उपलब्ध असेल.
Lava Yuva 4 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाची HD+ स्क्रीन आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128G स्टोरेजसह Unisoc T606 प्रोसेसर आहे. हा फोन Android 14 आधारित UI वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा देखील आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा होल-पंच स्लॉटमध्ये आहे.
Lava Yuva 4 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 10W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये ग्लॉसी बॅक डिझाइन आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा फोन प्रॅक्टिकल फीचर्स, मॉडर्न डिझाइन आणि परवडणारी किंमत या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, एंट्री लेवलवरील वापरकर्त्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. Lava Yuva 4 ने मागील मॉडेल प्रमाणेच डिस्प्ले, प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज क्षमता कायम ठेवली आहे. पण या व्यतिरिक्त, डिझाइन, कॅमेरा सुधारणा आणि चार्जिंग सपोर्ट देखील सुधारले गेले आहेत.