
दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी
Redmi Note 15 5G स्मार्टफोन 128GB आणि 256GB अशा दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आणि 256GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 2 हजार रुपयांचे बँक डिस्काऊंट देखील समाविष्ट आहे. अॅक्सिस, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्ड ट्रांजेक्शनवर 3 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. रेडमी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दोन महिने युट्यूब प्रीमियम, तीन महिने स्पॉटिफाय प्रीमियम स्टँडर्ड आणि सहा महिने गुगल वन अॅक्सेस देत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
The slimmest and lightest REDMI Note ever, without compromise. ➡️ 108MP Camera
➡️ 7.35mm thin
➡️ Powered by Snapdragon 6 Gen 3 Meet the #REDMINote15 5G. Starting at ₹19,999* | First sale on 9th Jan#FasterStongerSimplyBetter Know More: https://t.co/iRSOIqiTVI pic.twitter.com/TTKQmqD16m — Redmi India (@RedmiIndia) January 6, 2026
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये 6.77-इंच (1,080 x 2,392 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. कंपनीने लाँच केलेले हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 चिपसेट, 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. डिव्हाईसमध्ये डुअल-सिम, Android 15-बेस्ड HyperOS 2 आहे. नवा स्मार्टफोन चार वर्षांचे OS आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट ऑफर करत आहे. ब्रँडने असा दावा केला आहे की, या हँडसेटला लवकरच अँड्रॉइड 3 वर आधारित हायपरओएस 16 चे ओटीए अपडेट देखील मिळणार आहे. डिव्हाईसच्या वरच्या बाजूला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या नवीन डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 108-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या पुढील बाजूला 20-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसच्या मागील कॅमेऱ्याने तुम्ही 4K 30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. कंपनीच्या नव्या हँडसेटमध्ये 5,520mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Ans: Redmi चे बहुतांश फोन भारतात Make in India अंतर्गत तयार केले जातात.
Ans: Redmi स्मार्टफोन्स Android आधारित HyperOS / MIUI वर चालतात.
Ans: होय, Redmi चे बहुतेक नवीन स्मार्टफोन्स 5G नेटवर्क सपोर्टसह येतात.