Tecno Spark 30C चा नवीन व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno ने भारतीय बाजारात आपल्या Spark 30C चा नवीन व्हेरिअंट लाँच केला आहे. Spark 30C स्मार्टफोन आता 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या फोनमध्ये Mediatek Dimensity 6300 प्रोसेसरचा समावेश आहे, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता आणखी चांगली आहे. आता Spark 30C च्या नवीन व्हेरियंटसह यूजर्सना स्मार्टफोनचा उत्तम अनुभव मिळणार आहे. चला तर मग Spark 30C स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटचे किंमतीपासून ते उपलब्धता आणि वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Noise चे दोन नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम डिझाइन
Tecno कंपनीने 21 जानेवारीपासून Spark 30C च्या नवीन व्हेरिअंटची विक्री सुरू केली आहे, ज्याची किंमत कंपनीने 12,999 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरवर उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्हाला Spark 30C च्या नवीन व्हेरिअंट खरेदी करायचा असल्यास तुम्ही तो आता फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरवरून खरेदी करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो, यापूर्वी कंपनीने हा हँडसेट 4GB/64GB स्टोरेज आणि 4GB/128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. ज्याची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,499 रुपये आहे. पण अधिक रॅम असलेला हा फोन आता युजर्ससाठी आकर्षक आणि पॉवरफुल पर्याय म्हणून उपलब्ध आहे. आता कंपनीने या स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट लाँच केला आहे.
कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक Spark 30C स्मार्टफोनचा नवीन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंट तीन रंगांमध्ये खरेदी करू शकतात. ज्यामध्ये Azure Sky, Midnight Shadow आणि Aurora Cloud यांचा समावेश आहे.
डिस्प्ले- टेक्नोच्या Tecno Spark 30C स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाची एचडी एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येते.
प्रोसेसर- मीडियाटेक डायमेन्सिटी चिप या स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी समाविष्ट करण्यात आली आहे.
स्टोरेज- Tecno Spark 30C मध्ये 8GB RAM सह 128GB स्टोरेज व्हेरिअंट आहे. तथापि, त्याची रॅम 8 GB पर्यंत वाढवता येते, तर स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा- Tecno Spark 30C मध्ये फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह 48MP Sony IMX582 कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अरे व्वा! आता तुमचं WhatsApp अकाऊंट फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत करू शकता लिंक, काय आहे प्रोसेस?
बॅटरी- Tecno Spark 30C स्मार्टफोनमध्ये 5,000mAh पर्यंतची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करण्यास सक्षम आहे.
इतर वैशिष्ट्ये- याशिवाय, तुम्हाला Spark 30C मध्ये Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर मिळतात. ज्यामुळे साऊंड क्वालिटीचा अनुभव देखील चांगला होतो.