चीननंतर आता ग्लोबल मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार जगातील पहिला Triple-Fold Smartphone! हे आहेत Huawei Mate XT चे स्पेशल फीचर्स
सप्टेंबर 2024 मध्ये जगातील पहिला ट्रिपल-फोल्ड फोन Huawei Mate XT चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्याची तयारी केली जात आहे. जगातील पहिला ट्रिपल-फोल्ड फोन Huawei Mate XT आता ग्लोबल मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. सप्टेंबरमध्ये लाँच झालेला हा फोन सध्या फक्त चीनमध्ये उपलब्ध आहे आणि पुढील महिन्यापर्यंत तो जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच झाल्यानंतर इतर देशातील लोकं देखील तो खरेदी करू शकणार आहेत. आतापर्यंत Huawei ही जगातील एकमेव कंपनी आहे जिने ट्रिपल-फोन लाँच केला आहे.
तुमचा iPhone लॉक झालाय का? ही सोपी ट्रीक करणार मदत, काही क्षणांतच पासवर्ड होईल रीसेट
जगातील पहिला ट्रिपल-फोल्ड फोन Huawei Mate XT अलीकडेच TDRA सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट झाला आहे, जिथे तो GRL-LX9 मॉडेल नंबर म्हणून सूचीबद्ध होता. याशिवाय, कंपनी 2025 च्या पहिल्या तिमाहीत जगातील इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करू शकते असे वृत्त आधीच आले होते. आता हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच केला जाणार असल्याचं समोर आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा फोन एक उत्तम OLED डिस्प्ले अनुभव देतो. Huawei Mate XT मध्ये 6.4 इंच स्क्रीन आहे, पण फोन ओपन केल्यानंतर ही स्क्रीन अधिक मोठी होते. जेव्हा स्मार्टफोन अर्धा उघडला जातो तेव्हा त्याचा स्क्रीन आकार 7.9 इंच असतो आणि जेव्हा तो पूर्णपणे उघडला जातो तेव्हा स्क्रीनचा आकार 10.2 इंच होतो. इतका मोठा डिस्प्ले असूनही, पूर्णपणे उघडल्यावर त्याची जाडी 3.6 मिमी राहते. या स्मार्टफोनमध्ये Huawei चा Kirin 9010 5G चिपसेट देण्यात आला आहे.
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50 एमपी प्रायमरी, 12 एमपी अल्ट्रा-वाइड आणि 12 एमपी टेलिफोटो लेन्स आहेत. सेल्फी आणि व्हिडिओसाठी यात फ्रंटला 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 5,600 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की Mate XT मध्ये जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन बॅटरी आहे.
चीनमध्ये, या फोनच्या 16GB RAM+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 19,999 चिनी युआन म्हणजेच अंदाजे 2.42 लाख रुपये आहे. तर टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 23,999 युआन म्हणजेच अंदाजे 2.90 लाख रुपये आहे. जागतिक बाजारातही या किमतीच्या आसपास हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. तथापि, कंपनीकडून अद्याप याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.
Telegram युजर्सना मिळणार हे नवीन फीचर्स, App वापरण्याचा अनुभव होणार अधिक मजेदार
सॅमसंगने आपल्या पहिल्या ट्राय-फोल्ड फोनची घोषणा केली आहे. लवकरच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. Galaxy G Fold या नावाने सॅमसंगचा पहिला ट्राय-फोल्ड लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंग या फोनमध्ये इनवर्ड फोल्डिंग स्क्रीन देऊ शकते. या फोनचे डिझाईन Huawei Mate XT पेक्षा बरेच वेगळे असणार आहे.