BSNL Recharge Plan: बीएसएनएलने लाँच केला स्वस्त प्लॅन, 10 महिने सिम राहणार अॅक्टिव्ह! डेटा, कॉल आणि मिळणार बरंच काही
BSNL ही देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत BSNL त्यांच्या युजर्सना अनेक फायदे ऑफर करते. इतर टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करत असतानाच BSNL ने अनेक कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा ऑफर केली जाते. त्यामुळे इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे रिचार्ज प्लॅन अत्यंत परवडणारे असतात.
boAt ने लाँच केले बजेट फ्रेंडली ईयरबड्स, प्रिमियम लूक आणि जबदरस्त ऑडियो क्वालिटी केवळ इतक्या किंमतीत
आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी कमी किंमतीत 10 महिने तुमचं सिम अॅक्टिव्ह ठेऊ शकता. शिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे दोन सिम असतील आणि तुम्ही तुमचं दुसरं सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर BSNL चा 797 रुपयांचा रिचार्ज बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. बीएसएनएलच्या बजेट-फ्रेंडली योजनांच्या आकर्षणामुळे, गेल्या काही महिन्यांत नंबर पोर्ट करणाऱ्या वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोबाईल रिचार्ज प्लॅन खूप महाग झाले आहेत. जिओ, एअरटेल आणि व्हीआयने किंमती वाढवल्यानंतर, दोन अॅक्टिव्ह नंबर मॅनेज करणे हे अनेक लोकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत, सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने कमी किमतीत जास्त व्हॅलिडीटी देणारे अनेक परवडणारे प्लॅन ऑफर करून आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही 797 रुपयांच्या किंमतीत तुमचं सिम 10 महिने अॅक्टिव्ह ठेऊ शकता. याचा अर्थ तुम्ही मासिक रिचार्जचा त्रास कमी करू शकता आणि यामध्ये तुमचे पैसे देखील वाचणार आहेत.
बीएसएनएलकडे अनेक प्लॅन्स आहेत
बीएसएनएलकडे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत. जे दीर्घ वैधता कालावधीसह अनेक चांगले फायदे देखील देतात. बीएसएनएलकडे एक खास प्लॅन आहे, जो 300 दिवसांची वैधता देतो. म्हणजेच फक्त एका रिचार्जने तुम्ही जवळजवळ एक वर्ष तणावमुक्त सेवेचा आनंद घेऊ शकता. या योजनेसह तुमचे बीएसएनएल कनेक्शन पूर्ण 10 महिने सक्रिय राहील. आपण ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत तो 797 रुपयांचा आहे. हा प्लॅन युजर्सना 300 दिवसांपर्यंत व्हॅलिडीटी ऑफर करतो. जास्त खर्च न करता त्यांचे सिम कार्ड सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
खरंतर, 797 रुपयांच्या बीएसएनएल प्लॅनमध्ये तुम्हाला 300 दिवसांची वैधता मिळते. परंतु, आउटगोइंग कॉलिंग फीचर फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी उपलब्ध असेल. या सुरुवातीच्या काळात, तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करू शकता. याशिवाय, तुम्हाला पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना या प्लॅनमध्ये एकूण 120 जीबी डेटा मिळतो. या कालावधीत तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.
लक्षात ठेवा की पहिल्या 60 दिवसांनंतर, तुम्ही कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सेवा गमवाल. जर तुम्हाला नंतर कॉल करायचे असतील तर तुम्हाला वेगळा प्लॅन निवडावा लागेल. आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, ही ऑफर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे जे बीएसएनएलचा दुय्यम सिम म्हणून वापरतात आणि रिचार्ज पर्यायांवर जास्त खर्च करण्यास आवडत नाहीत.