Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DeepSeek नंतर आता Kimi ची एंट्री, चिनी कंपनीच्या AI मॉडेल्सची जगभरात चर्चा! हे चॅटबोट पडले मागे

डीपसीकनंतर आणखी एका चिनी कंपनीच्या एआय मॉडेलने अमेरिकन कंपन्यांना घाम फोडला. Kimi k1.5 हे चीनी स्टार्टअप कंपनी Moonshot चा AI प्लॅटफॉर्म आहे. Kimi k1.5 इतर चॅटबोट्सपेक्षा प्रचंड वेगळे आहे, आणि युजर्ससाठी फायदेशीर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 10:39 AM
DeepSeek नंतर आता Kimi ची एंट्री, चिनी कंपनीच्या AI मॉडेल्सची जगभरात चर्चा! हे चॅटबोट पडले मागे

DeepSeek नंतर आता Kimi ची एंट्री, चिनी कंपनीच्या AI मॉडेल्सची जगभरात चर्चा! हे चॅटबोट पडले मागे

Follow Us
Close
Follow Us:

AI च्या बाबतीत चिनी टेक कंपन्यांनी सर्व जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अनेक टॉप AI कंपन्यांना चिनच्या AI मॉडेल्सनी मागे टाकलं आहे. त्यामुळे आता जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात चीनच्या AI मॉडेल्सची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या AI मॉडेल DeepSeek ची चर्चा सुरु होती. DeepSeek नंतर आता चीनच्या नवीन AI ने एंट्री केली आहे. या AI मॉडेलने इतर AI चॅटबोट्सना मागे टाकलं आहे. या AI मॉडेलचं नाव आहे, Kimi k1.5.

ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps

हे चॅटबोट पडले मागे

DeepSeek सोबतच आता Kimi k1.5 ने देखील जगभरात खळबळ उडवली आहे. Kimi k1.5 दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या AI प्लॅटफॉर्मबद्दल असे सांगितले जात आहे की हे GPT-4o आणि अमेरिकन AI कंपनी OpenAI च्या Claude 3.5 Sonnet पेक्षा जास्त प्रगत आहे. त्यामुळे आता चीनचे दोन्ही AI मॉडेल्स इतरांना जबरदस्त टक्कर देत आहेत. Kimi k1.5 ने OpenAI च्या GPT-4o आणि Anthropic च्या Claude 3.5 Sonnet मॉडेलला अनेक बेंचमार्कवर पराभूत केले आहे. हे गणित, कोडींग आणि मजकूर आणि व्हिज्युअल इ. समजून घेण्यासाठी OpenAI-01 शी स्पर्धा करण्यातही यशस्वी ठरले आहे. (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)

Kimi k1.5 बद्दल जाणून घेऊया

चायनीज स्टार्टअप Moonshot AI ने AI मॉडेल Kimi k1.5 लाँच केले आहे. अलीकडेच हे AI प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले होते, आणि अगदी कमी कालावधीतच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. Kimi k1.5 वापरकर्त्याच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम आहे. त्याची थेट स्पर्धा OpenAI-o1 शी आहे. Kimi k1.5 प्रथम वापरकर्त्याने विचारलेला प्रश्न समजतो. त्यानंतरच तो प्रश्नावर प्रतिक्रिया देतो.

प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच, Kimi k1.5 AI गणिताच्या समस्या सोडवण्यासही सक्षम आहे. यासोबतच हे एआय मॉडेल कोडिंग आणि इतर कामांमध्येही लोकप्रिय होत आहे. चीनी स्टार्टअपच्या या एआय प्लॅटफॉर्मबद्दल सांगितले जात आहे की ते फोटो आणि व्हिडिओ देखील समजू शकते. या सर्व फीचर्समुळे Kimi k1.5 AI ची लोकप्रियता वाढत आहे. अनेक बेंचमार्कमध्ये त्याने अमेरिकन कंपन्यांच्या मॉडेल्सचा पराभव केला आहे.

Kimi K1.5 हे इतर AI मॉडेल्सपेक्षा वेगळे कसे?

किमी k1.5 बद्दल सांगितले जात आहे की ते AI मॉडेल रीइन्फोर्समेंट लर्निंग तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तर इतर AI मॉडेल स्थिर डेटासेटवर काम करतात. म्हणूनच हे मॉडेल रीजनिंग प्रोब्लेम सहजपणे सोडवते. यासोबतच हे AI मॉडेल वापरकर्त्यांच्या एक्सप्लोरेशन आणि फीडबॅकमधून सतत शिकत राहते. हे AI मॉडेल एका गुंतागुंतीच्या समस्येचे छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये विभाजन करून निराकरण करते. Kimi k1.5 हे केवळ AI मॉडेल नाही. रीइन्फोर्समेंट लर्निंग आणि मल्टीमॉडल रीजनिंगमध्ये ही एक मोठी झेप मानली जात आहे. हे AI मॉडेल मजकूर तसेच व्हिज्युअल आणि कोडिंग तसेच विविध प्रकारचे फाइल स्वरूप समजू शकते. डेवलपर्सचे म्हणणे आहे की Kimi k1.5 मॉडेल OpenAI च्या GPT-4o आणि Claude Sonnet 3.5 पेक्षा चांगले आहे.

चीन अमेरिकेला मागे टाक घेणार मोठी झेप

एक वेळ अशी होती जेव्हा अमेरिकन टेक कंपन्यांनी सरकारी निर्बंधांमुळे AI चिपसेट आणि तंत्रज्ञान चीनी कंपन्यांसोबत शेअर करण्यास नकार दिला होता. मात्र आज चिनी कंपन्या त्यांचे स्वतःचे AI मॉडेल लाँच करत आहेत, जे अमेरिकेच्या AI मॉडेल्सपेक्षा चांगले ठरत आहे. चिनी AI कंपन्यांच्या AI मॉडेल्सची किंमत अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत अनेक पटींनी कमी आहे. मात्र तरी देखील त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. DeepSeek लाँच होताच जगातील सर्वात मोठी चिप कंपनी Nvidia च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अ‍ॅप स्टोअरवर मारली बाजी

DeepSeek ने जगभरात जोरदार चर्चा

चायनीज स्टार्टअप DeepSeek ने आपल्या AI मॉडेल्सने जगाला वेड लावले आहे. एका आठवड्यामध्ये, विनामूल्य ॲप्सच्या बाबतीत ॲप स्टोअरवरील OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकले आहे. DeepSeek बनवण्यासाठी फारच कमी खर्च आला, ज्याने तंत्रज्ञान जगाला आश्चर्यचकित केले आहे.

Web Title: Tech news china ai chatbot kimi overtake openai chatbot chatgpt know how it works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.