बर्थ-डेथ सर्टिफिकेटसाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ एक क्लिक आणि WhatsApp द्वारे होणार काम
बर्थ-डेथ सर्टिफिकेट प्रत्येक व्यक्तिसाठी अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट असते. पण हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण अनेक सरकारी कार्यालयांना भेटी दिल्या असतील. पण कार्यालयात भेट दिल्यानंतर आपल्याला बर्थ-डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी फार मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं. काहीवेळा तर अनेक तासं रांगेत थांबून देखील आपलं कामं होत नाही. अशावेळी खूप वैताग येतो आणि आपण एजंटला पैसे देऊन बर्थ-डेथ सर्टिफिकेट घेतो. पण आता असं करण्याची गरज नाही. आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवरचं बर्थ-डेथ सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही रांगेत उभं राहण्याची देखील गरज नाही.
Upcoming iPhone: 2025 मध्ये लाँच होणार Apple चे 5 नवे iPhone, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी जन्म-मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात खूप भेटी दिल्या असतील. अनेक तास रांगेत देखील थांबला असाल, पण आता असं याची गरज नाही. आता सरकारव्दारे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवरचं बर्थ-डेथ सर्टिफिकेट शेअर केलं जाणार आहे. आंध्र प्रदेश सरकार लवकरच ही योजना सुरू करणार आहे. त्यानंतर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुमच्या मोबाईलवर तुमचे बर्थ-डेथ सर्टिफिकेट मागू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आंध्र प्रदेश सरकार लवकरच त्यांच्या नागरिकांना ‘व्हॉट्सॲप गव्हर्नन्स सर्व्हिसेस’ अंतर्गत व्हॉट्सॲपद्वारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे प्रदान करणार आहे. मुख्य सचिव के विजयानंद यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी ही घोषणा केली. ते म्हणाले की या प्रक्रियेची चाचणी घेण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस तेनाली येथे या सेवेसाठी पायलट प्रोजेक्ट आयोजित केले जाणार आहेत.
विजयानंद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने राज्य सरकार लवकरच लोकांना व्हॉट्सॲप गव्हर्नन्स सेवा उपलब्ध करून देणार आहे. या अंतर्गत लोकांना लवकरच जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. व्हॉट्सॲपवर मृत्यू प्रमाणपत्र मिळू शकेल.
रीअल-टाइम गव्हर्नन्स सोसायटी (RTGS) कार्यालयात सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत या प्रक्रियेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. विजयानंद यांनी यावर जोर दिला की व्हॉट्सॲप गव्हर्नन्स सुरू करून सरकारी सेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांनी आरटीजीएस आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी RTGS अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी पंचायती राज, आरोग्य आणि नगरपालिका प्रशासन विभागांना दिले आहेत.
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. अर्ज करावा लागतो आणि तपासानंतर तेथून प्रमाणपत्र दिले जाते. पण यासाठी अर्जदारांना महापालिकेच्या अनेक फेऱ्याही माराव्या लागतात. अनेकवेळा लोकांकडून लाचही मागितली जाते. अशा परिस्थितीत राज्य सरकार लोकांच्या सोयीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आता आंध्र प्रदेशातील लोकांना व्हॉट्सॲपवर जन्म – मृत्यू प्रमाणपत्र मिळू शकेल.