Android युजर्सना मिळणार सुपरपॉवर! स्मार्टफोन चोरी झाला तरी डेटा राहणार सुरक्षित, Google ने आणलं अप्रतिम फीचर
आपला स्मार्टफोन म्हणजे आपल्यासाठी जीव की प्राण आहे. स्मार्टफोन उंचीवरून पडला किंवा फुटला किंवा अचानक बंद झाला, तर आपल्याला प्रचंड भिती वाटते. कारण आपला स्मार्टफोन सुरक्षित रहावा, त्याला काही होऊ नये, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतं. स्मार्टफोनमध्ये आपल्या जुन्या आठवणींपासून ते आर्थिक व्यवहाराच्या डेटापर्यंत सर्व काही स्टोअर केलेले असते. त्यामुळे आपला स्मार्टफोन हॅक किंवा चोरी होऊ नये, अशी चिंता प्रत्येकाला सतावत असते.
OpenAI ची कमाल, लाँच केला अनोखा AI एजेंट! टायपींगपासून स्क्रोलींगपर्यंत चुटकीसरशी होतील कठीण कामं
स्मार्टफोन चोरी झाला तर तो शोधणं फार कठीण आहे. कारण चोर आपल्या स्मार्टफोनमधील सर्व सिक्योरिटी फीचर्स तात्काळ बंद करतात, ज्यामुळे युजर्सना त्यांचा स्मार्टफोन शोधणं फार कठीण होतं. शिवाय अशा परिस्थितीत स्मार्टफोनमधील आपल्या डेटाला देखील धोका निर्माण होतो. पण आता अँड्रॉईड युजर्सच्या या समस्येवर गूगलने एक उपाय आणला आहे. गुगलने अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी एक नवीन फीचर आणले आहे. हे नवीन फीचर आयडेंटिटी चेक या नावाने लाँच करण्यात आलं आहे. हे फीचर बायोमैट्रिक-बेस्ड ऑथेंटिकेशनवर आधारित आहे. स्मार्टफोन चोरीच्या घटनांमध्ये हे गूगलचे नवीन फीचर अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलने माहिती दिली आहे की जर तुमचा फोन चुकीच्या हातात पडला तर अशा परिस्थितीत तुमच्या स्मार्टफोनमधील संवेदनशील डेटा लीक होण्याची शक्यता असते, ज्यामुळे युजर्सची आर्थिक फसवणूक तसेच गोपनीयतेला धोका निर्माण होतो. त्यामुळे युजर्सच्या सुरक्षेसाठी हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. सध्या हे वैशिष्ट्य Android 15 वर चालणाऱ्या Google Pixel आणि Samsung Galaxy डिव्हाइसेससाठी आणले जात आहे. नंतर ते इतर डिव्हाईससाठी देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
हे फीचर सक्षम केल्यानंतर, डेटामध्ये प्रवेश करणे कठीण होते. तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा एखाद्याला पासवर्ड माहीत असल्याने त्याने तो फोन अनलॉक केला तरीही तो व्यक्ति तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा ऍक्सेस करू शकणार नाही. त्याला डिव्हाइसच्या सेटिंग्ज आणि ‘ट्रस्टेड लोकेशन’ च्या बाहेरील काही खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. वापरकर्त्यांना एकाधिक ट्रस्टेड लोकेशन जोडण्याचा पर्याय असेल. जर कोणी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करू शकत नसेल तर तो पिन कोड बदलू शकणार नाही. याशिवाय, तो Find My Device आणि Theft Protection इत्यादी बंद करू शकणार नाही.
Google Chrome युजर असाल तर सावधान! तुमचा पर्सनल डेटा होऊ शकतो चोरी, सरकारने दिली वॉर्निंग
थोडक्यात सांगायचं झालं तर, एखादी व्यक्ती स्मार्टफोनमधील बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करत नाही, तोपर्यंत तो स्मार्टफोनचा पिन बदलू शकणार नाही. तसेच Find My Device आणि Theft Protection इत्यादी बंद करू शकणार नाही. म्हणणजेच स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर देखील तुमचा डेटा सुरक्षित राहणार आहे.
लक्षात घ्या की हे वैशिष्ट्य फक्त वर्ग 3 बायोमेट्रिक्सला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनवर उपलब्ध असणार आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर (अल्ट्रासोनिक किंवा ऑप्टिकल) आणि 3D फेस रेकग्निशन असलेले डिव्हाईस क्लास 3 बायोमेट्रिक डिवाइस मानली जातात. पूर्वी याला स्ट्राँग बायोमेट्रिक्स म्हटले जायचे.