OpenAI ची कमाल, लाँच केला अनोखा AI एजेंट! टायपींगपासून स्क्रोलींगपर्यंत चुटकीसरशी होतील कठीण कामं
जगातील पहिलं AI चॅटबोट तयार करणारी कंपनी OpenAI ने आता पुन्हा एकदा कमाल केली आहे. कंपनीने आता एक एआय एजंट लाँच केलं आहे. OpenAI ने ऑपरेटर एआय एजंट लाँच केलं आहे. युजर्सच्या मदतीसाठी आणि त्यांची अनेक कामं अगदी चुटकीसरशी केली जावीत यासाठी हे नवीन एआय एजंट लाँच करण्यात आलं आहे. OpenAI ने लाँच केलेलं हे एआय एजंट ब्राउझरमध्ये काम करतो. टायपींगपासून स्क्रोलींगपर्यंत अगदी सर्व कामांसाठी ऑपरेटर एआय एजंट तुम्हाला मदत करणार आहे.
Google Chrome युजर असाल तर सावधान! तुमचा पर्सनल डेटा होऊ शकतो चोरी, सरकारने दिली वॉर्निंग
गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी ऑपरेटर एआय एजंटवर काम करत होती. यासंबंधित अनेक अपडेट देखील सतत समोर येत होते. आता अखेर कंपनीने हे ऑपरेटर एआय एजंट लाँच केलं आहे. ऑपरेटर एआय एजंट युजर्ससाठी ब्राउझरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ऑपरेटर एआय एजंट सध्या यूएसमध्ये प्रो वापरकर्त्यांसाठी रिसर्च प्रीव्यू म्हणून उपलब्ध करून देण्यात आलं आहे. येत्या काही काळातच अधिक वापरकर्त्यांसाठी ऑपरेटर एआय एजंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हे भारतात कधी लाँच केलं जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI ने लाँच केलेला ऑपरेटर एआय एजंट आहे, ब्राउझरमध्ये काम करतो आणि अनेक कठीण गोष्टी अगदी सहज करू शकतो. कंपनी खूप दिवसांपासून यावर काम करत होती आणि आता अखेर हे टूल उपलब्ध करून देण्यात आलं आहे. येत्या काळात अधिक वापरकर्त्यांसाठी हे टूल लाँच केले जाईल.
नवीन कंप्यूटर-यूजिंग एजंट (CUA) मॉडेल वापरून ऑपरेटर अनेक कार्ये पूर्ण करतो. हे ब्राउझरमध्ये फॉर्म भरणे, बुकिंग सेवा आणि ऑनलाइन ऑर्डर देणे इत्यादी कामं करण्यासाठी सक्षम आहे. हे GPT-4o च्या विजन क्षमतेसह एडवांस्ड रीजनिंग आणि टूल्सच्या मदतीने वेबसाइट्स नेव्हिगेट करते. हे मानवांप्रमाणे वेब पेजवर आपोआप क्लिक करू शकते, टाइप करू शकते आणि स्क्रोल देखील करू शकते. त्याला कमांड देऊन टास्क नियुक्त करता येतात. पासवर्ड एंटर करणे आणि पेमेंट या कामंसाठी ऑपरेटर युजर्सची मदत घेतो. याचाच अर्थ ऑपरेटर तुमची सर्व कामं सुरक्षितपणे करू शकतो. यामुळे युजर्सच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे.
सध्या OpenAI चे हे टूल सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यावरून फीडबॅक घेऊन कंपनी त्यात सुधारणा करेल. कंपनी इतर वापरकर्त्यांसाठी ते रोल आउट करण्याची तसेच ChatGPT मध्ये इंटीग्रेट करण्याची योजना आखत आहे. OpenAI ने म्हटले आहे की त्यांनी वापरकर्त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली आहे आणि ऑपरेटर स्वतः आर्थिक व्यवहार करणार नाही. वापरकर्त्यांकडे प्राइवेसी सेटिंग मॅनेज करणे, ब्राउझिंग डेटा हटवणे आणि डेटा कलेक्शनची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील असेल. त्यामुळे ऑपरेटर तुम्हाला तुमच्या अनेक कामांत मदत करत असाल तर त्यामुळे तुमच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
Tecno Spark 30C चा नवीन व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
एआय एजंटची आजकाल बरीच चर्चा आहे आणि अनेक कंपन्या त्यावर काम करत आहेत. तर दुसरीकडे काही लोक याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. या तंत्रज्ञानाचा लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होणारा परिणाम याबद्दल त्याची चिंता व्यक्त केली जात आहे.